प्रत्येक जखमेवर हळद लावणे किती योग्य ?
आपल्याकडे घराघरात लहान मोठ्या जखमांवर हळद सहज लावली जाते. कारण हळद हे एक नैसर्गिक जंतुनाशक आणि अँटीबायोटिक म्हणून काम करते. जंतूंचा संसर्ग टाळता येतो व सूजही कमी होते. यामुळे पूर्वापार हाच प्रथमोपचार केला जातो. पण अशा प्रकारे कोणत्याही जखमेवर हळद लावणे योग्य आहे का हे समजायला हवं.
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो. जो अॅटी बायोटीकचा काम करतो. त्यामुळे संसर्ग होत नाही आणि जखमही लवकर भरते. ग्रामीण भागात प्राण्यांवर हाच उपचार केला जातो. पण माणसांच्या बाबतीत गंभीर जखमांवर हळद लावणे टाळावे. कारण अशा जखमा आतपर्यंत झालेल्या असतात. त्वचेतील टिश्यूंना हानी झालेली असते. बऱ्याचवेळा उघड्या जखमेवर थेट हळद लावल्याने आग होणे आणि एलर्जी सारख्या समस्या होतात.
जखमेवर हळद लावताना काळजी घ्यावी लागते. सगळ्यात आधी जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. त्यामुळे त्यात माती किंवा इतर कचरा राहत नाही. त्यानंतर एकदम त्यावर हळद न लावता. हळदयुक्त मलमच्या रुपात लावावी. त्यावर बँडेज बांधावे. पण तरी जखम बरी होत नसल्यास तात्काळ डॉक्टरकडे जावे.
Comments are closed.