Rakshabandhan Special: घरच्या घरी बनवा इको फ्रेंडली राखी




को फ्रेंडली राखी


रक्षाबंधन म्हटलं की बहिणीच्या हातात ओवाळणीचं ताट आणि राखी तर भावाच्या हातात प्रेमाने घेतलेलं गिफ्ट हे चित्र डोळ्यासमोर येतं. रक्षाबंधन जवळ आलं की बाजारात अनेक प्रकारच्या राख्या विकण्यास असतात. यामुळे राखी घेताना एक गोष्ट नक्की होते ही घेऊ की ती घेऊ या विचाराने बहिणी गोंधळून जातात. पण यंदा भावासाठी राखी बाजारातून विकत घेण्यापेक्षा अधिक प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवण्याचा विचार करत असाल तर इको फ्रेंडली राखी हा एक सुंदर पर्याय ठरू शकतो. घरात सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून ही राखी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते. Eco Friendly Rakhi At Home

राखी बनवण्यासाठी साहित्य
रंगीत कापूस किंवा ज्यूटची दोरी, रंगीत कागद, कात्री, गोंद, काही लाकडी मणी आणि सजावटीसाठी कापसाचे छोटे गोळे एवढं साहित्य पुरेसं आहे. शक्यतो प्लास्टिकची सजावट टाळा.

इको फ्रेंडली राखी
इको फ्रेंडली राखी

अशी बनवा राखी
– सर्वप्रथम ज्यूट किंवा कापसाची दोरी भावाच्या मनगटाच्या आकारानुसार घ्या आणि दोन्ही टोकांना बांधण्यासाठी थोडी जास्त जागा ठेवा.
– रंगीत कागदाचा छोटा गोल, फूल किंवा पानाच्या आकाराचा तुकडा कापून घ्या. ही राखीची मध्यवर्ती सजावट असेल.
– कागदाच्या सजावटीच्या मध्यभागी छोटा लाकडी मणी किंवा कापसाचा गोळा चिकटवा. त्याभोवती छोटे कागदी आकार लावून सुंदर डिझाइन तयार करा.
– तयार केलेली सजावट ज्यूट किंवा कापसाच्या दोरीच्या मध्यभागी गोंदाने व्यवस्थित चिकटवा. गोंद पूर्णपणे सुकू द्या.
– राखी मजबूत झाली आहे का ते तपासा. त्यानंतर ती कागदाच्या छोट्या पाकिटात ठेवा.

इको फ्रेंडली राखी
इको फ्रेंडली राखी

यंदा बाजारातील नेहमीची राखी घेण्याऐवजी स्वतःच्या हाताने तयार केलेली साधी, सुंदर आणि पर्यावरणपूरक राखी भावाला बांधा. खर्च कमी, साहित्य सोपं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या राखीत तुमचा वेळ आणि प्रेम दोन्ही असतील.



Comments are closed.