भावाला राशीनुसार बांधा राखी
रक्षाबंधन हा फक्त भावाच्या हातात राखी बांधण्यापुरता सण नसून भावा बहीणीच्या अतूट प्रेमाचा दिवस आहे. यामुळे लाडक्या भावाच्या हातावर कोणती राखी बांधावी याची तयारी बहीणी महिन्याभराआधी पासूनच करतात. यामुळे जर तुम्हीही याच विचारात असाल तर तुम्ही भावाला त्याच्या राशीच्या शुभ रंगानुसार सुंदर डिझाईनची आकर्षक राखी बांधू शकता. त्यासाठी जाणून घेऊया १२ राशीनुसार कोणते रंग शुभ आहेत.
जाळी – मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्साही, निडर, उर्जावान आणि उत्तम नेतृत्वगुण असणाऱ्या असतात. या राशीसाठी लाल, नारंगी, किंवा गडद लाल रंग शुभ मानला जातो. रक्षाबंधनासाठी तुम्ही मेष राशीच्या भावाला लाल मणी, रुद्राक्ष असलेली किंवा साधी लाल पण आकर्षक डिझाईनची राखीही बांधू शकता.
वृषभ- वृषभ राशीचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो. या राशीच्या व्यक्तींसाठी सफेद, क्रीम, गुलाबी किंवा हळका निळा रंग भुभ मानला जातो. य़ामुळे तुम्ही भावाला मोती, चंदन या रंगाच्या कमी डिझाईन असलेली साधी राखी बांधू शकता.
मिथुन-मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुधाचा संबंध बुद्धीबरोबर आहे. हिरवा रंग या राशीसाठी शुभ मानला जातो. यामुळे या राशीच्या भावासाठी हिरवी, मेहंदी किंवा पिस्ता रंगाची राखी घ्यावी.
कर्करोग-कर्क राशीचा संबंध चंद्राशी आहे. त्यामुळे या राशीसाठी सफेद, सिल्वर,फिकट निळा
रंग शुभ मानला जातो. त्यामुळे या राशीच्या भावासाठी मोतीचे डिझाईन असलेली राखी, चांदीची राखी घ्यावी.
सिंह-सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. यामुळे सोनेरी, नारिंगी,लाल आणि पिवळा रंग या राशीसाठी शुभ मानला जातो. सिंह राशीच्या भावाला सूर्य किंवा ओमचे डिझाईन असलेली राखी बांधावी.
कन्या- कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे हिरवा रंग यांच्यासाठी शुभ मानला जातो. हिरवा, पोपटी, पिस्ता रंगाची राखी तुम्ही या राशीच्या भावासाठी घेऊ शकता.
तूळ- तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. गुलाबी, सफेद, क्रिम आणि आकाशी रंग या राशींसाठी शुभ मानला जातो. या राशीच्या भावासाठी मोती लावलेली, मोत्यांची राखी तुम्ही बांधू शकता.
वृश्चिक- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. लाल, मरून, गडद नारंगी रंग यांच्यासाठी शुभ आहेत. त्यामुळे तुम्ही भावाला रुद्राक्ष असलेली, लाल मौली असलेली राखी बांधू शकता.
धनु- धनु राशीचा स्वामी गुरू आहे. त्यामुळे पिवळा, सोनेरी, फिकट नारंगी रंग यांच्यासाठी शुभ आहे. पिवळ्या धाग्यांनी विणलेली, किंवा पिवळा रंग असलेली राखी तुम्ही भावाला बांधू शकता.
मकर- मकर राशीचा स्वामी शनि आहे. यामुळे .या राशीसाठी निळा, नेव्ही ब्लू रंग शुभ आहे. यामुळे याच रंगाची राखी भावांना बांधावी.
कुंभ- कुंभ राशाचा स्वामी शनि आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी निळा, राखाडी, रंग शुभ आहे. या राशीच्या भावासाठी तुम्ही याच रंगाच्या राख्या घेऊ शकता.
मीन- मीन राशीचा स्वामी गुरू आहे. पिवळा, फिकट नारंगी आणि सोनेरी रंग या राशीसाठी शुभ मानले जातात. मीन राशीच्या भावांना पिवळ्या, चंदन, क्रिम रंगाच्या राखी बांधाव्यात
Comments are closed.