अभिनेत्री तारा सुतारियाला डिस्कैलकुलिया आजार; काय आहेत याची लक्षणे
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की ती डिस्कैलकुलिया (Dyscalculia) नावाच्या न्यूरोलॉजिकल लर्निंग डिसऑर्डरने ग्रस्त आहे. या आजारामुळे तिला संख्या, हिशोब आणि मूलभूत गणित समजून घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. पैशांचे व्यवहार आणि कागदपत्रे हाताळताना तिच्याकडून गणिताच्या चुका होतात, असे तिने सांगितले आहे. मात्र, तिचे वडील आणि तिची अकाउंट्स टीम या कामात तिला पूर्ण मदत करते. नक्की या आजाराची लक्षणे काय आहेत आणि यावर उपचार शक्य आहेत का हे जाणून घेऊयात. actress tara sutaria has dyscalculia
डिस्कॅल्क्युलिया म्हणजे नक्की काय?
डिस्कॅल्क्युलियाला मॅथ डिस्लेक्सिया असेही म्हटले जाते. हा मेंदूशी संबंधित असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीचा मेंदू गणिताचे नियम किंवा संख्यांची प्रक्रिया सामान्य लोकांप्रमाणे करू शकत नाही. यामुळे व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर कोणताही परिणाम होत नाही, फक्त हिशोब करताना अडचण येते.
लक्षणे
- संख्या लक्षात ठेवणे किंवा त्यांचा क्रम समजणे कठीण जाते.
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करणे जमणे कठीण होते.
- वेळ, तारीख, अंतर किंवा पैशांच्या हिशोबाचा अंदाज लावताना अडचण येते.
- ॲनालॉग घड्याळात वेळ ओळखताना त्रास होतो.
उपचार
या आजारावर औषधोपचार उपलब्ध नसले तरी, लहान वयातच याचे योग्य निदान झाले तर थेरपिस्ट आणि विशेष शिक्षण पद्धतींच्या मदतीने यातील अडचणी कमी करता येतात. जर एखाद्या मुलाला गणिताची जास्तच भीती वाटत असेल तर त्याच्याशी बोलून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा – तो येतोय….. 23 ऑक्टोबरला, येताय ना?
Comments are closed.