बाळकृष्णाचा पाळणा सजवण्यासाठी सोप्या टिप्स

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा आणि त्याच्या पाळण्याची सजावट महत्त्वाची असते. लाडक्या बाळकृष्णाचा पाळणा कसा सुंदर दिसेल याचाच सर्वजण विचार करतात. तुम्हीही यंदा जन्माष्टमीसाठी बाळकृष्णाचा पाळणा सजवण्याच्या विचारात असाल, तर पुढील सोप्या टिप्स वापरू शकता. krishna jhula decoration tips

नैसर्गिक फुलांचा वापर

पाळण्याला सजवण्यासाठी झेंडूची फुले, मोगरा आणि गुलाबाच्या माळांचा वापर करू शकता. फुलांच्या माळा पाळण्याच्या दांड्यांना आणि साखळीला गुंडाळल्यास पाळणा छान दिसेल.

गोटा पट्टी

पाळण्याच्या आत बाळकृष्णासाठी लाल, पिवळ्या किंवा मोरपिसी रंगाचे वेल्वेट किंवा सिल्कचे कापड वापरता येईल. पाळण्याच्या कडांना गोटा-पट्टी लावल्याने राजेशाही लुक येईल.

मोरपीस आणि बासरी

मोरपीस पाळण्याच्या वरच्या बाजूला किंवा दोन्ही कोपऱ्यांत लावू शकता. सोबतच बासरीला रंगीबेरंगी दोऱ्यांनी सजवून पाळण्यात बाळकृष्णाच्या शेजारी ठेवू शकता.

फेअरी लाईट्स

पाळण्याच्या साखळीभोवती फेअरी लाईट्स गुंडाळा. यामुळे पाळणा चमकेल.

मडक्यांची सजावट

पाळण्याच्या दोन्ही बाजूला लहान रंगवलेली मातीची मडकी टांगा. त्यात कापूस भरून लोण्याचा देखावा तयार करता येईल.

हेही वाचा – कधी आहे श्री कृष्ण जन्माष्टमी? वाचा एका क्लिकवर संपूर्ण माहिती

Comments are closed.