न्यू मॉमसाठी मॅटर्निटी गाऊन, मिडी





जर तुम्ही आई होणार असाल किंवा नव्यानेच आई झाल्या असाल तर तुमची जबाबदारी नक्कीच वाढली असेल. अशावेळी बाळाबरोबरच स्वत:ची काळजी घेणं तुमच्यासाठी गरजेचे आहे. त्यातच याकाळात बदलणारे हार्मोन्समुळे तुमचे वजनही वाढलेल असतं अशावेळी बाळाला सांभाळताना , पाजताना नक्की कोणते आरामदायी कपडे वापरावेत याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तर याकाळात न्यू मॉमसाठी मॅटर्निटी गाऊन हे बेस्ट ऑप्सन मानले जाते.

मॅटर्निटी गाऊन तुम्हाला दिवसभर रिलॅक्स ठेवतातच शिवाय ब्रेस्टफिडींग करणेही सोपे होते. त्यातच जर लहान बाळाला सोबत घेऊन तुम्ही प्रवास करणार असाल तर न्यू मॉमसाठी मॅटर्निटी मिडी किंवा हाफ गाऊन हे बेस्ट ऑपश्न आहेत. बारीक फुलांचे डिझाईन असलेले मॅटर्निटी गाऊन, मिडी महिलांमध्ये प्रिय आहे. या गाऊन किंवा मिडिमध्ये बाळाला सहज ब्रेस्टफिड करता यावं यासाठी दोन झिपलॉक असतात. त्यामुळे बाळाला पाजताना न्यू मॉमला अंगावर दुप्पटा , स्टोल घ्यावा लागत नाही.

कॉटनमध्ये मिळणारे हे गाऊन आणि मिडी वापरण्यास सोयीस्कर असून टिकाऊ देखील असतात. यांची किंमत त्यांच्या ब्रँडनुसार असते. तरी चांगल्या प्रतीच्या मॅटर्निटी गाऊन,मिडिची किंमती या ६००-१००० रुपयांपासूनच सुरू होतात. वापरण्यास आणि धुण्यास सोयीस्कर असे मॅटर्निटी गाऊन, मिडी बाजारात न्यू मॉमच्या कपड्यांच्या दुकानात मिळतात.



Comments are closed.