2026 मध्ये ग्रोसरी बास्केटमध्ये बदल; चिप्सच्या जागी आले हे स्नॅक्स
किराणा सामानाची यादी म्हटलं की पूर्वी चिप्स, बिस्किटं, नमकीन आणि गोड पदार्थ सहजपणे बास्केटमध्ये जायचे. पण 2026 मध्ये हीच Grocery Basket हळूहळू बदलताना दिसतेय. चवीसोबतच प्रोटीन, कमी साखर, पौष्टिक घटक आणि पदार्थांमध्ये नेमकं काय आहे, याकडेही ग्राहक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे चिप्स-बिस्किट्ससोबत काही नवीन पर्यायांना पसंती मिळताना दिसते.
चिप्स ऐवजी मखना
मखाना हा हलका आणि कुरकुरीत पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे. साधा किंवा वेगवेगळ्या चवींचा मखाना संध्याकाळच्या खाण्यासाठी अनेकजण निवडत आहेत.
बिस्किट्सऐवजी नट्स आणि सीड्स
बदाम, अक्रोड, काजू, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या पदार्थांचा वापर स्नॅक म्हणून वाढला आहे. यामुळे पटकन भूक लागल्यावर तुलनेने पौष्टिक पर्याय उपलब्ध होतो.
प्रथिने समृद्ध पर्याय
प्रोटीन बार, प्रोटीनयुक्त दही, प्रोटीन शेक आणि इतर प्रोटीनयुक्त पदार्थांकडेही ग्राहकांचा कल वाढताना दिसतो. विशेषतः व्यायाम आणि फिटनेसकडे लक्ष देणाऱ्यांमध्ये हे पर्याय लोकप्रिय आहेत.
मैद्याऐवजी भरड धान्यांना पसंती
मैद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांऐवजी बाजरी, ज्वारी, नाचणी आणि इतर भरड धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खरेदी करण्याकडेही कल वाढतोय. त्यामुळे घरच्या खरेदीच्या यादीत पारंपरिक धान्यांना पुन्हा स्थान मिळत आहे.
कमी साखरेचे पर्याय
साखरेचे प्रमाण आणि पदार्थांमधील घटक याबाबत ग्राहक अधिक जागरूक होत आहेत. त्यामुळे खजूर किंवा गूळ वापरलेले पदार्थ, कमी साखरेचे स्नॅक्स आणि साधे पदार्थ यांना पसंती मिळत आहे.
चिप्स आणि बिस्किट्स अजूनही अनेकांच्या बास्केटचा भाग आहेत. मात्र त्यासोबत मखाना, नट्स, बिया आणि प्रोटीनयुक्त पदार्थांसारखे पर्याय वाढत आहेत.
Comments are closed.