Health Tips: गणेशोत्सवात निरोगी राहण्यासाठी खास टिप्स

गणेशोत्सव म्हटलं की प्रसाद, मोदक, चिवडा आणि नातेवाईकांच्या घरी होणाऱ्या जेवणावळी आल्याच. पण उत्सवाच्या धावपळीत खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या तर अॅसिडिटी, पोट फुगणे, आळस आणि जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे बाप्पाचा उत्सव मनसोक्त साजरा करताना आरोग्याचीही थोडी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

1) मिठाईचा अतिरेक

दिवसभर थोडं-थोडं गोड खात राहण्याऐवजी एकदा योग्य प्रमाणात मिठाई किंवा मोदक खा. आवडता पदार्थ हळूहळू खाल्ल्याने त्याचा आनंदही घेता येतो आणि अति खाणेही टाळता येते.

2) जेवण स्किप नको

सणाचा पदार्थ खाणार आहोत म्हणून आधीपासून उपाशी राहू नका. खूप भूक लागल्यावर समोरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जाण्याची शक्यता असते.

3) संतुलित आहार

भाज्या, डाळी, कडधान्ये, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असलेले संतुलित जेवण पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करते. त्यामुळे नंतर मिठाई समोर आली तरी प्रमाण सांभाळणे सोपे जाते.

4) गोड पेये टाळा

गणपतीच्या भेटीगाठींमध्ये सरबत, शीतपेय किंवा इतर गोड पेये सहज घेतली जातात. त्याऐवजी दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा.

5) तळलेले पदार्थ

फरसाण, समोसा, वडा आणि भजी, पुरी असे पदार्थ सणाच्या मेनूमध्ये हमखास असतात. चव घ्या, पण त्यांचे प्रमाण कमी ठेवणे चांगले.

6) हालचाल ठेवा.

जड जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी 10 ते 15 मिनिटे चालणे उपयोगी ठरू शकते. त्यासोबत रोजच्या नियमित व्यायामाची सवय कायम ठेवा.

7) या व्यक्तींनी घ्या  काळजी

मधुमेह, लठ्ठपणा किंवा कोलेस्टेरॉल वाढलेले असल्यास गोड आणि तळलेल्या पदार्थांचे प्रमाण अधिक काळजीपूर्वक ठरवा. तुमच्या आरोग्यस्थितीनुसार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Comments are closed.