मानेच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?
अनेकदा मानेवर गाठ किंवा सूज आल्यावर त्याकडे घशाचा संसर्ग किंवा सामान्य आजार समजून दुर्लक्ष करण्यात येतं. मात्र, ही सूज मानेच्या कॅन्सरचे (Neck Cancer) सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे कॅन्सरच्या उपचारांसाठी आजाराचे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे असते. मानेच्या कॅन्सरमधील लिम्फ नोडस् म्हणजे काय आणि त्यांच्यातील बदल कसे ओळखायचे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
लिम्फ नोड्स म्हणजे काय?
लिम्फ नोड्स या आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्या वाटाण्याच्या किंवा मूग-बीन्सच्या आकाराच्या लहान गाठींसारख्या असतात. शरीरात प्रवेश करणाऱ्या बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर हानिकारक घटकांना रोखून आजारांपासून बचाव करण्याचे काम या नोड्स करतात. सामान्यतः या नोड्सची साईझ 1 सेंटीमीटरपेक्षा कमी असते आणि त्या बाहेरून सहजासहजी जाणवत नाहीत.
संसर्गामुळे आलेली सूज
जेव्हा शरीराला सर्दी, खोकला किंवा घशाचा इन्फेक्शन होते, तेव्हा इन्फेक्शनशी लढताना लिम्फ नोड्स सुजतात. इन्फेक्शन पूर्णपणे बरे झाल्यावर ही सूज 2 ते 3 आठवड्यांत आपोआप कमी होते.
कॅन्सरमुळे आलेली सूज
कॅन्सरच्या पेशी मूळ ठिकाणाहून पसरून जेव्हा लिम्फ नोड्समध्ये पोहोचतात, तेव्हा या गाठी सुजतात. कॅन्सरमुळे आलेली सूज कमी होण्याऐवजी हळूहळू वाढत जाते आणि कडक जाणवते.
लक्षणे
- औषधोपचार करूनही घशातील वेदना कमी न होणे.
- 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज घोगरा राहणे.
- अन्न किंवा पाणी गिळताना वेदना होणे.
- तोंड किंवा घशातील अल्सर 2 आठवड्यांत बरे न होणे.
- सतत कान किंवा जबडा दुखणे.
डॉक्टरांचा सल्ला
मानेवर कोणतीही गाठ किंवा सूज 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहत असल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप – सुजलेली प्रत्येक गाठ किंवा लिम्फ नोड म्हणजेच कर्करोग असे नाही. मात्र, निदानाला उशीर झाल्यास आजार वाढू शकतो, त्यामुळे वेळेवर तपासणी करणे हाच योग्य पर्याय आहे.
हेही वाचा – फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवावेत आणि कोणते नाहीत?
Comments are closed.