Mouth Tapingचा स्लिप ट्रेंड खरंच सुरक्षित?





शांत झोप मिळावी आणि घोरण्याची समस्या कमी व्हावी यासाठी सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे स्लिप ट्रेंड पाहायला मिळतायत. यापैकी एक म्हणजे माउथ टेपिंग. या ट्रेंडमध्ये झोपताना तोंडावर विशेष टेप लावली जाते, ज्यामुळे तोंड बंद राहून नाकातून श्वास घेण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, हा उपाय प्रत्येकासाठी सुरक्षित असेलच असे नाही. माउथ टेपिंगमुळे घोरणे कमी होते किंवा झोपेची गुणवत्ता निश्चितपणे सुधारते, याबाबत  सध्यातरी कोणतेही पुरावे नाहीत.

तज्ज्ञ काय सांगतात?

नाक बंद असणे, सतत ऍलर्जी होणे, सायनसची समस्या, नाकाच्या रचनेशी संबंधित अडथळे किंवा श्वास घेण्याची समस्या असणाऱ्यांनी स्वतःहून माउथ टेपिंग करू नये. तोंड बंद केल्यामुळे अशा व्यक्तींना रात्री श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्वचेवर लालसरपणा, खाज किंवा टेपमुळे ऍलर्जीही होऊ शकते.

सतत घोरण्याला असू शकते वेगळे कारण

सतत घोरणे हे कधी कधी Sleep Apnea सारख्या झोपेशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे केवळ टेप लावून समस्या सोडवण्याऐवजी त्यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच सोशल मीडियावरील ट्रेंड पाहून हा उपाय लगेच सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरू शकते.

हेही वाचा – Period Pain Relief: पीरियड्स क्रॅम्प्सपासून आराम देणारे गॅजेट्स



Comments are closed.