फोडलेला नारळ खराब होण्याची भीती? या ट्रिक्सने महिनाभर ठेवा ताजे
सण उत्सवात नारळाचा वापर सर्रास केला जातो. पूजेसाठी किंवा स्वयंपाकासाठी नारळ फोडला की, उरलेले ओले खोबरे लवकर खराब होण्याची किंवा त्याला बुरशी येण्याची भीती असते. अनेकदा फ्रिजमध्ये ठेवूनही २-३ दिवसांत खोबऱ्याची चव बदलते किंवा त्याला दुर्गंधी येऊ लागते. परंतु, काही सोप्या किचन ट्रिक्सचा वापर केला तर फोडलेले ओले खोबरे आठवडेच नव्हे, तर महिनाभर अगदी ताजे ठेवता येते.
मिठाचे पाणी
एका काचेच्या डब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडेसे मीठ टाका आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे या पाण्यात बुडवून ठेवा. हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. दर 2 ते 3 दिवसांनी डब्यातील पाणी बदलत राहा. यामुळे ओले खोबरे 10 ते 15 दिवस खराब होत नाही.
फ्रीझरमध्ये स्टोअर
ओले खोबरे किसून घ्या. हा किस एका एयरटाईट डब्यात किंवा झिप-लॉक बॅगमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवा. अशा प्रकारे फ्रीझरमध्ये ठेवलेले खोबरे 1 ते 2 महिने अगदी ताजे राहते.
हलके भाजून ठेवणे
किसलेले ओले खोबरे मंद आचेवर तव्यावर 2 मिनिटे हलके परतून घ्या. यामुळे जास्तीचा ओलावा निघून जातो. हे खोबरे थंड झाल्यावर डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते आठवडाभर खराब होत नाही.
हवेचा संपर्क टाळा
नारळ उघडा हवेत किंवा साध्या प्लेटमध्ये ठेवल्यास तो लवकर सुकतो आणि त्यावर बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे खोबरे नेहमी हवा बंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवावे.
महत्त्वाची टीप – नारळ फोडण्यापूर्वी त्यातील पाणी आधीच वेगळे काढून घ्या. फोडलेला नारळ बाहेर रूम टेम्परेचरवर न ठेवता लगेचच वर दिलेल्या पद्धतींपैकी एका पद्धतीने स्टोअर करावा, नक्कीच टिकेल.
हेही वाचा – उरलेला प्रसाद फ्रिजमध्ये ठेवताना टाळाव्यात या चुका
Comments are closed.