पपई नैसर्गिक पिकलेली आहे कि केमिकलने? कसं ओळखाल ?





बाजारात मिळणारी पिवळी धम्मक पपई बघून आपण ती पूर्ण पिकलेली आहे समजून विकत घेतो. पण ती पपई खरचं नैसर्गिकरित्या पिकलेली आहे की केमिकल प्रक्रियेने ती पिकवली गेली आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे काहीवेळा पपई खाल्ल्याने काहीजणांना त्रास होतो. तो टाळण्यासाठी पपई विकत घेताना कोणती खबरदारी घ्यावी ते बघूया.

तज्ज्ञानुसार फक्त पपई पिवळी धम्मक आहे म्हणजे ती केमिकलनेच पिकवली गेली असेल असे नाही. कारण काही पपईंचा रंग निसर्गातह पिवळा धम्मक असतो. त्यामुळे रंगावरून अंदाज लावणे पूर्णतह योग्य नाही.

तर ज्या पपईला गोड सुंगध आहे. जिचे आवरण सगळ्याबाजूने एकाच प्रकारे पिकलेले असते. ज्या पपईचा रंग सर्वबाजूने सारखाच असतो ती नैसर्गिकरित्या पिकलेली असते.

तर जी पपई रंगाने पिवळी धम्मक व पिकलेली दिसते. पण स्पर्श केल्यावर काही ठिकाणी टणक आणि काही ठिकाणी नरम असते अशा पपई विकत घेणे , खाणे टाळावे. कारण त्यावर केमिकलचा वापर झाल्याची शक्यता अधिक असते. प्रामुख्याने फळ पिकवण्यासाठी एथिलिन गॅसचा वापर केला जातो. हा गॅस फळ पिकावीत यासाठी हार्मोन्सचे काम करतो. त्यामुळे त्याला सुरक्षित समजले जाते.

पण काही फळ विक्रेते एथिलीन ऐवजी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करतात. जे हानिकारक केमिकल आहे. कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवण्यात आलेली फळं खाल्ल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. यामुळे विश्वासू फळ विक्रेत्याकडूनच फळ विकत घ्यावी.



Comments are closed.