प्रत्येक घरात हे ‘मेडिकल डिवायसेस’ असायलाच हवेत
घरातील सदस्यापैकी जर कोणाची तब्येत बिघडली तर असे काही मेडिकल डिवायसेस तुमच्या घरात असायला हवेत जे हेल्थ रिडींगसाठी उपयुक्त असतील. त्यासाठी कोणते मेडिकल डिवायसेस घरात असायला हवेत ते बघूया.
प्रामुख्याने ज्या घरांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर, हृदयाशी, श्वसनाशी संबंधित आजार असलेली व्यक्ती असेल तर घरात मेडीकल डिवायसेस असणे गरजेचे असते. त्यामुळे तब्येत बिघडल्यास रुग्णाची हेल्थ अपडेट घेणे डॉक्टरांना तात्काळ कळवणे आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीचे किंवा डॉक्टर घरी पोहचेपर्यंतचे प्राथमिक उपचार तुम्ही सहज करू शकता.
रक्तदाब यंत्र- हल्ली सगळ्यांनाच ताण तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो. अशावेळी घरात जर बीपी मशीन असेल तर बीपीच्या चढ उताराकडे लक्ष ठेवता येते. त्यानुसार डॉक्टरांना अपडेट देता येते जेणे करून डॉक्टरांना ट्रिटमेंट करणे सोपे होते.
ग्लुकोमीटर- जर घरात कोणाला मधुमेह म्हणजे शुगर असेल तर ग्लूकोमीटर घऱात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी शुगर रिडींग घेता येते. त्यातही जर कोणी शुगर कमी करण्याचे मोडीसिन किंवा इन्सुलिन घेत असेल तर त्यांच्यासाठी ग्लूकोमीटर आवश्यक आहे. कारण शुगर कमी झाल्यास लक्ष द्यावे लागते.
नाडी ऑक्सिमीटर-करोना काळात सगळ्यांनीच पल्स ऑक्सीमीटर जवळून पाहीले आहे. ऑक्सीजन कमी जास्त झाले का ते चेक करण्यासाठी पल्स ऑक्सीमीटर कामी येते. ज्यांना श्वासासी संबंधित त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पल्स ऑक्सीमीटर जवळ ठेवावे. पल्स रेट तपासून त्यातील चढ उतार डॉक्टरांना सांगावा.
थर्मामीटर-ताप तपासण्यासाठी थर्मामीटर घरात ठेवायलाच हवे. त्यामुळे डॉक्टरांना ताप किती आहे हे सांगता येतो. त्यानुसार डॉक्टरांना औषध देणे सोपे जाते.
स्मार्टवॉच –हल्ली बाजारात स्मार्टवॉच सहज मिळतात. ज्यामुळे श्वास उच्छावाच्या रेटवर लक्ष ठेवता येते. तसेच बीपी रेटही हे स्मार्ट वॉच दाखवतो. त्यामुळे तब्येतीची काळजी घेता येते.
ऑक्सिजन सिलेंडर- जर घरात कोणाला फुफ्फुसाशी संबंधित आजार असेल तर डॉक्टरांच्या संमतीने ऑक्सीजन सिलेंडरचा उपयोग करणे फायदेशीर असते.
नेब्युलायझर-जर घरात कोणाला अस्थमा, सीओपीडी यासाऱखे श्वासाशी संबंधित आजार असतील तर त्यांच्यासाठी नेब्युलायझर उपयोगी असते. नेब्युलायझरमधून रुग्णाला औषध दिले जाते.
मात्र हे मेडीकल डिवायसेस वापरावे कसे याची माहीती असणेही आवश्यक आहे.
Comments are closed.