डस्टबिनमधून वास येतोय? ही सोपी ट्रिक करा ट्राय
घर कितीही स्वच्छ ठेवले तरी अनेकदा स्वयंपाकघरातील डस्टबिनमधून येणारा घाणेरडा वास संपूर्ण घरात पसरतो. विशेषतः ओला कचरा, भाजीपाला किंवा उरलेले पदार्थ डस्टबिनमध्ये साचल्यामुळे काही वेळातच दुर्गंधी येऊ लागते. या दुर्गंधीमुळे घरात बॅक्टेरिया वाढतात आणि माश्याही येतात. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर सोपी ट्रिक जाणून घेऊयात.
बेकिंग सोडाची सोपी ट्रिक
डस्टबिनमधील दुर्गंधी कायमची दूर करण्यासाठी बेकिंग सोडा हा सर्वात सोपा उपाय आहे. यामध्ये दुर्गंधी शोषून घेण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात.
असा करा वापर
- डस्टबिन पूर्णपणे रिकामा करून साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून वाळवून घ्यावा.
- डस्टबिनमध्ये कचऱ्याची पिशवी टाकण्यापूर्वी डब्याच्या तळाशी 1 ते 2 चमचे बेकिंग सोडा भुरभुरा.
- तुम्ही बेकिंग सोड्याऐवजी कापसाच्या बोळ्यावर एसेंशियल ऑईलचे काही थेंब टाकून तो कापूस डब्याच्या तळाशी ठेवू शकता.
- यानंतर त्यावर नेहमीप्रमाणे कचऱ्याची पिशवी लावावी.
इतर टिप्स
- डस्टबिनमध्ये ओला कचरा टाकण्यापूर्वी वर्तमानपत्राचा कागद तळाशी ठेवावा, ज्यामुळे द्रव पदार्थ शोषले जातात.
- लिंबाची वाळलेली साल डस्टबिनच्या तळाशी ठेवल्यास दुर्गंधी येत नाही आणि ताजेपणा राहतो.
- डस्टबिन रोजच्या रोज रिकामा करण्याची सवय ठेवावी.
हेही वाचा – केमिकलने पिकवलेली केळी ओळखण्याच्या सोप्या पद्धती
Comments are closed.