दुपारची Power Nap किती वेळाची असावी?
दुपारी जेवण झालं की अचानक डोळे जड होतात, कामात लक्ष लागत नाही आणि फक्त काही मिनिटं डोळे मिटावेसे वाटतात. विशेषतः सकाळपासून ऑफिसचं काम, घरची कामं किंवा सतत स्क्रीनसमोर राहिल्यानंतर दुपारची छोटी झोप ताजेतवाने वाटायला मदत करू शकते. पण दुपारची झोप नेमकी किती वेळ घ्यावी? खूप कमी वेळ घेतला तर फायदा होईल का आणि जास्त वेळ झोपल्यास रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो का?
10 ते 20 मिनिट पवार नॅप
दिवसा झोप घ्यायची असल्यास साधारण 10 ते 20 मिनिटांची छोटी झोप अनेक लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. यामुळे पूर्णपणे गाढ झोपेत जाण्याची शक्यता कमी राहते आणि उठल्यानंतर जडपणा कमी जाणवू शकतो. त्यामुळे दुपारी थोडा आराम हवा असेल तर अलार्म लावून छोटी नॅप घेणे हा सोपा पर्याय आहे.
कोणत्या वेळी झोपावे?
पवार नॅप शक्यतो दुपारच्या सुरुवातीला किंवा मध्यावर घेणे योग्य ठरू शकते. खूप उशिरा घेतलेली झोप काही लोकांच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम करू शकते. त्यामुळे संध्याकाळच्या अगदी जवळ नॅप घेण्याऐवजी दुपारच्या वेळेतच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
जास्त झोपल्यास…
दुपारची झोप खूप लांबली तर काही जण गाढ झोपेच्या टप्प्यात जाऊ शकतात. त्यातून उठताना काही काळ जडपणा, गुंगी किंवा आळस जाणवू शकतो. याला स्लीप इनर्शिया म्हणतात.
दुपारची पावर नॅप म्हणजे दुपारी तासन्तास झोपणे नाही. छोटी, योग्य वेळेची झोप हा त्यामागचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे दिवसा झोप घ्यायची असेल तर सुरुवातीला 10–20 मिनिटांची नॅप घेऊन पाहा आणि त्याचा तुमच्या रात्रीच्या झोपेवर व दिवसभराच्या ताजेतवानेपणावर कसा परिणाम होतो ते लक्षात घ्या.
Comments are closed.