प्रत्येकवेळी सोबत कशाला? एकटं राहण्यातही आहे मजा





तुम्हालाही लहान सहान गोष्टींसाठी सतत कोणाची ना कोणाची सोबत हवी असते ? जसे की मंदीरात जाण्यासाठी, बागेत फिरण्यासाठी, बँकेत जाण्यासाठी,डॉक्टरकडे जाताना, शॉपिंगला जाताना,हॉटेलमध्ये जाण्यासाठी तर ही सवय सोडा. कारण यात तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देत आहात. प्रत्येकवेळी समोरची व्यक्ती तुमच्यासाठी उपलब्धच असेल असे नाही. तिला इतरही काम असू शकतात. मग यात तुमचा जोडीदार, मुलं, मित्र मैत्रीण किंवा तुमची शेजारीणही असू शकते. मग अशावेळी तुमचा मूड ऑफ होण्याची शंभर टक्के शक्यता असते. कारण तुमचे ते काम किंवा आनंद समोरच्या व्यक्तीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. पण हे टाळता येण सहज शक्य आहे. त्यासाठी स्वत:मध्ये आत्नविश्वास निर्माण करा. एकट राहण्यातील मजा अनुभवा. कोणावरही अवलंबून राहू नका.

एकटेपणा म्हणजे एकाकी नाही
आपल्याकडे एकटं काम करणारे किंवा एकट्याने फिरायला जाणाऱ्यांकडे नकारात्नकतेने पाहीले जाते. पण मानसशास्त्रात याच्या दो्न्ही बाजूंना महत्व आहे. त्यानुसार एकटेपण ही अशी परिस्थिती आहे ज्यात काहीवेळा चारहीबाजूला माणसं असताना व्यक्ती आतून मात्र एकाकी असते. तर एकट राहणाऱ्या , कोणावरही अवलंबून नसणाऱ्या व्यक्ती मनाने खंबीर आणि आनंदी असतात. म्हणूनच मानसोपचारत्त्रज्ञही मी टाईमचे महत्व सांगतात.

एकटेपणाचे फायदे
आजच्या डिजिटल काळात सगळेचजण रिकामा वेळ मोबाईलमद्ये घालवू लागले आहेत. सोशल मीडिया स्क्रॉलिग, चॅटींग किंवा ओटीटीवर वेबसारिज, फिल्म बघण्यात वेळ व्यतीत करण्याचा ट्रेंडच आहे. पण या सगळ्या गोंधळात आपण स्वत कसे जगतोय हेट आपल्या लक्षात येत नाही. म्हमूनच आत्नचिंतन , आत्मशोध करणे महत्वाचे आहे. त्यामुळे मानसिक विकास तर होतोच शिवाय सर्व प्रकारच्या परिस्थितीतही हाताळण्याचे कौशल्य शिकायला मिळते.

आत्मविश्वास
एकट्याने जगणाऱ्या व्यक्ती या ोकणावरही अवलंबून नसतात. त्यामुळे त्यांचे मानसिक जडणघडण मजबूत होते. आत्मविश्वास बळावतो. स्वत:च्या निर्णयावर विश्वास असल्याने आपण करू शकतो ही भावना त्यांच्यात ओतप्रोत असते. त्यामुळे यश मिळवण त्यांना सहज शक्य होत. याउलट सतत दुसऱ्याच्या खांद्याच्या प्रतिक्षेतील व्यक्ती मागेच राहतात.

मानसिक आजार
ज्या व्यक्ती एकट्याने काम करतात त्यांना मानसिक आजार होण्याची शक्यता कमी असते. अँक्झायटी अशा व्यक्तींना होत नाही. याउलट ज्या व्यक्ती सतत कोणावर तरी अवलंबून असतात त्यांना अँक्झायटी सारख्या मानसिक व्याधी लवकर जडतात.



Comments are closed.