मुंबईत अचानक पावसाचा धुडगूस; अंधेरी सबवेसह अनेक रस्ते पाण्याखाली




मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेसह अनेक रस्ते पाण्याखाली


मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या काळात पावसाचा मोठा खंड पडला असून जवळपास 45 दिवस पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. मात्र आज (29 सप्टेंबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे एकीकडे मुंबईकरांची तारांबळी उडाली, तर दुसरीकडे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना त्याच पाण्यातून घरापर्यंत वाट काढत जावे लागत आहे.



Comments are closed.