मासिक पाळीत स्विमिंग करणे कितपत सुरक्षित?

मासिक पाळीच्या काळात पोहणे किंवा स्विमिंग करणे पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. योग्य काळजी आणि स्वच्छता बाळगल्यास पाळीदरम्यान कोणतीही अडचण न येता स्विमिंगचा आनंद घेता येतो  असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या दिवसांत शरीरात होणारे क्रॅम्प्स, पोटदुखी आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी हा हलका व्यायाम उपयुक्त ठरतो. स्विमिंगमुळे शरीरात एंडॉर्फिन हे हॅपी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होऊन मन आणि शरीर प्रसन्न राहण्यास मदत होते.

काय काळजी घ्यावी?

स्विमिंग करताना सॅनिटरी पॅड्स वापरणे टाळावे, कारण ते पाण्यामुळे फुगतात आणि गळती होऊ शकते. त्याऐवजी पुढिल पर्याय निवडावेत.

मॅन्स्ट्रुअल कप

हा अत्यंत सुरक्षित, इको-फ्रेंडली आणि लीक-प्रूफ ऑप्शन आहे.

टॅम्पॉनचा वापर

पोहण्यासाठी टॅम्पॉनचा वापर करणे सोपे असते. पोहून झाल्यावर तो बदलणे गरजेचे आहे.

कालावधी पोहण्याचे कपडे

हलक्या प्रवाहाच्या दिवशी विशेष पिरियड स्विमवेअर वापरता येतात.

पाण्यात असताना पाण्याच्या नैसर्गिक दाबामुळे रक्ताचा प्रवाह तात्पुरता रोखला जातो. मात्र, पाण्याबाहेर आल्यानंतर रक्ताचा प्रवाह रोखण्यासाठी योग्य प्रॉडक्ट्सचा वापर करणे गरजेचे आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे इन्फेक्शन टाळण्यासाठी स्विमिंगनंतर लगेचच ओले कपडे बदलून स्वच्छ कपडे घालावेत. जर जास्त थकवा किंवा तीव्र पोटदुखी असेल तर शरीराला पुरेशी विश्रांती द्यावी.

हेही वाचा – दुपारची Power Nap किती वेळाची असावी?

Comments are closed.