नवरात्रीच्या उपवासात दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी काय खावे?
उपवासात थकवा नको! दिवसभर उत्साही राहण्यासाठी खा हे पदार्थ
नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास करतात. दिवसभर कडक उपवास असताना घरातील कामे, ऑफिस आणि इतर गोष्टींचा अनेकदा थकवा जाणवू लागतो. हा थकवा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी आणि शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उपवासाच्या काळात योग्य आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. उपवासात योग्य अन्नपदार्थांची निवड केल्यास शरीराला पुरेसे पोषण मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
तज्ज्ञ काय सांगतात?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उपवासाच्या दिवसांत कडक उपाशी राहण्यापेक्षा दिवसभरात थोडे-थोडे खाणे आणि शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे फायदेशीर ठरते.
ड्रायफ्रूट्स आणि मखाना
बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्तासारखे सुकामेवा शरीराला ऊर्जा देतात. याशिवाय मखाना तुपामध्ये हलके भाजून खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
फळे आणि फ्रूट ज्यूस
केळी, संत्री, डाळिंब, पपई आणि सफरचंद यांसारखी ताजी फळे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन्स आणि फायबर मिळतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो.
रताळे आणि बटाटा
रताळ्यामध्ये नैसर्गिक शर्करा आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात. उकडलेले बटाटे किंवा रताळ्याचे वेगवेगळे फराळाचे पदार्थ खाल्ल्याने ताकद टिकून राहते.
राजगिरा आणि शिंगाड्याचे पीठ
उपवासात राजगिरा किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी, पुरी किंवा हलव्याचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
दही आणि ताक
ताक किंवा घरचे गोड दही खाल्ल्याने पोट थंड राहते आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
भरपूर पाणी प्या
उपवासाच्या दिवशी घसा कोरडा पडू नये म्हणून दिवसभरात पाण्याचे सेवन वाढवावे. नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा फळांचे ताजा रस पिऊ शकता.
चहा-कॉफीचे अतिसेवन टाळा
अनेक जण ऊर्जा मिळवण्यासाठी दिवसभरात वारंवार चहा किंवा कॉफी पितात. परंतू या सवयीमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.
पुरेशी झोप
उपवासाच्या काळात शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे रात्री किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटेल.
हेही वाचा – Navratri Fasting Tips: नवरात्रीचे उपवास करताना ‘या’ चुका टाळा
Comments are closed.