मुलांना शाळेतून आल्यानंतर विचारू नयेत हे प्रश्न





मुलं शाळेतून घरी आल्यानंतर अनेक पालक त्यांच्यावर प्रश्नांची इतकी सरबत्ती करतात की मुलांना त्याचा स्ट्रेस येतो आणि उत्तरे देता देता ती थकून जातात. त्यामुळे त्यांचा उरलेला दिवसही खराब होतो. अभ्यासात मन लागत नाही, भूक असूनही जेवण जात नाही यावर यामुळे पालकांनी स्वत:मध्ये कोणते बदल करून घ्यावे हे समजणे महत्वाचे आहे. त्यासाठी काय करावे ते बघूया.

आरामशीर वातावरण
मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना लगेचच काय केलसं कसा गेला दिवस असे प्रश्न विचारायला सुरूवात करू नये. मुलं शाळेत अनेक तास घालवल्यानंतर घरी येतात. अशावेळी अर्धातास तरी त्यांना काहीही विचारू नये. मानसिक रित्या फ्रेश झाल्यानंतर मुलं स्वत:हूनच तुमच्याशी संवाद साधतील.

चिड चिड
काही मुलं शाळेतून घरी आल्यानंतर , युनिफॉ्रम, दप्तर , शूज, वॉटर बॉटल अक्षरश इकडे तिकडे फेकून देतात. यामुळे त्यांच्यावर रागावू नका. चिड चिड करू नका. त्यांना रिलॅक्स होऊ द्या. नंतर त्यांना वस्तू जागच्या जागी ठेवण्याबदद्ल सांगावे.

घरचे काम
मुलं शाळेतून आल्या आल्या त्याला लगेचच होमवर्कची आठवण करुन देऊ नका. ट्यूशनला लगेच पळवायची घाई करू नका. त्याला अभ्यासाचे प्रेशर देऊ नका. जरा मोकळा वेळ द्या. रिलॅक्स होऊ द्या मग बोला.

खाणं पिणं

शाळेतून आलेल्या मुलांच्या मागे जेवणाची कट कट करू नका. त्यांच्या मूडप्रमाणे घ्या. त्याला काय खायला आवडेल ते विचारा.

खेळण्याची वेळ
काही मूल शाळेतून आल्यावर थोडावेळ घरातच छोट्या मोठ्यांबरोबर मज्जा मस्ती करतात. त्यावर त्यांना ओरडू नका. थोडी मज्जा मस्ती करु द्या. त्यामुळे शाळेतील अभ्यासाचा ताण मुलांना जाणवत नाही.



Comments are closed.