बेडशीट खरेदी करताना टाळा या 5 चुका
बेडशीट खरेदी करताना अनेकदा घाईघाईत नकळत चुका होतात, ज्यांचा पश्चाताप घरी आल्यावर होतो. एखाद्या दुकानात बेडशीट खरेदीसाठी गेल्यावर आकर्षक रंग आणि डिझाइन पाहून विकत घेतो. परंतू केवळ सुंदर रंग किंवा आकर्षक प्रिंट पाहून बेडशीट खरेदी करणे चुकीचे ठरू शकते. उत्तम आणि दीर्घकाळ टिकणारी बेडशीट खरेदी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी यावर एक नजर टाकूया.
ऋतूनुसार फॅब्रिक
बेडशीट खरेदी करताना ती कोणत्या ऋतूत वापरली जाणार आहे, हे लक्षात घ्यावे. कॉटनची बेडशीट सर्व ऋतूंसाठी उत्तम असते कारण ती घाम शोषून घेते. याशिवाय गरमीसाठी लिननचे फॅब्रिक आरामदायक ठरते.
धाग्यांची संख्या
खास प्रसंगी बेडरूमला रॉयल लूक देण्यासाठी सिल्कची बेडशीट उत्तम पर्याय आहे तर हिवाळ्यात उबदारपणासाठी फ्लॅनेल फॅब्रिक योग्य ठरते. कोणतीही बेडशीट खरेदी करताना तिचा थ्रेड काउंट नेहमी 200 पेक्षा जास्त असावा. जास्त थ्रेड काउंट असलेली बेडशीट दिसायला प्रिमियम आणि हाताला अतिशय मऊ असते.
गडद रंग नको
खूप मोठ्या आणि डार्क प्रिंट्स किंवा अतिशय भडक रंगांच्या बेडशीट्स निवडणे टाळावे. यामुळे बेडरूमचा लूक खराब होतो. त्याऐवजी न्यूट्रल कलर्स, ऑफ-व्हाइट किंवा लाईट पेस्टल शेड्सची निवड करावी, यामुळे खोली प्रशस्त दिसते.
बेड कव्हर
बेडवर बेड कव्हरचा वापर करावा. यामुळे बेडरूम अधिक व्यवस्थित आणि स्टायलिश दिसतो तसेच बेडशीट धूळ-मातीपासून सुरक्षित राहते.
मॅट्रेसचे मोजमाप
बेडशीट खरेदी करताना आपल्या गादीचा आकार माहित असणे गरजेचे आहे. योग्य आकाराची बेडशीट बेडवर परफेक्ट बसते आणि वारंवार सरकत नाही.
हेही वाचा – ऑनलाइन ऑर्डर केलेले कपडे वेगळेच दिसतात? खरेदीपूर्वी या गोष्टी तपासा
Comments are closed.