ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी बेस्ट स्नोफॉल पॉइंट्स

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना सुरू होताच अनेक जण स्नोफॉलचा आनंद घेण्यासाठी फिरण्याचे प्लॅन करण्यास सुरूवात करतात. जर तुम्हालाही येत्या दिवसात निळाशार आकाश, गार वारा आणि बर्फाच्छादित डोंगररांगांचे सौंदर्य अनुभवायचे असेल, तर कोणती चार प्रसिद्ध ठिकाणे तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये असायला हवीत हे पाहूयात.

मनाली आणि रोहतांग पास

हिमाचल प्रदेशातील मनाली आणि रोहतांग पास हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान येथे सुंदर हिमवृष्टी पाहायला मिळते.

गुलमर्ग

भारताचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे काश्मीरमधील गुलमर्ग हे बर्फवृष्टीसाठी जगप्रसिद्ध आहे. येथील प्रसिद्ध गंडोला राईड आणि केबल कारमधून दिसणारा बर्फाने आच्छाडलेला परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.

औली

उत्तराखंडमधील औली हे भारतातील प्रमुख स्कीइंग डेस्टिनेशन मानले जाते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येथील पर्वतरांगांवर बर्फाची सफेद चादर पसरण्यास सुरूवात होते.

लाचूंग आणि युमथांग व्हॅली

उत्तर सिक्कीममधील लाचूंग आणि युमथांग व्हॅली या भागातही लवकर हिमवृष्टी सुरू होते. येथील दृश्य पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात.

प्रवासासाठी टिप्स

या महिन्यांत तापमान खूप कमी होते, त्यामुळे लोकरीचे आणि उबदार कपडे सोबत ठेवा.

प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित भागातील हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीची खात्री करून घ्या.

हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू शकते, त्यामुळे होटेल्स आणि प्रवासाचे बुकिंग आधीच करून ठेवावे.

हेही वाचा – होमस्टे निवडताना या चुका टाळा; अन्यथा होईल मनस्ताप

Comments are closed.