गोकर्णाच्या फुलांची नाईट क्रीम, सैल त्वचा होईल टाईट
चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, त्वचा सैल होणे आणि काळे डाग येणे यांसारख्या समस्या महिलांमध्ये सामान्य झाल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेकदा बाजारातील महागड्या क्रीम्स किंवा केमिकल्युक्त उत्पादनांचा वापर केला जातो. मात्र, केमिकल उत्पादनांऐवजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नैसर्गिक घटकांपासून बनवलेली नाईट क्रीम चेहऱ्यासाठी गुणकारी ठरू शकते. विशेषतः, गोकर्णाच्या फुलांपासून तयार केलेली नाईट क्रीम चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो टिकवून त्वचा टाईट ठेवण्यास मदत करते.
क्रीमसाठी साहित्य
- गोकर्णाची ताजी फुले
- कॉर्नफ्लोर – 1 टीस्पून
- कोर्फड तुरुंग
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल
- बदामाचे तेल
कृती
- गोकर्णाच्या फुलांचा हिरवा देठाचा भाग काढून बाजूला करा आणि फुले स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
- एका वाटीत पाणी घेऊन त्यात ही फुले 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा. पाण्याचा रंग हलका निळा झाल्यानंतर, ती फुले त्याच पाण्यासह मिक्सरमध्ये वाटून मऊ पेस्ट तयार करा.
- एका भांड्यात एक चमचा कॉर्नफ्लोर घेऊन त्यात ही फुलांची पेस्ट व्यवस्थित मिसळा, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत.
- आता एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात हे मिश्रण ठेवा आणि सतत ढवळत राहा. 2 ते 3 मिनिटांनी हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅसवरून काढून थंड होऊ द्या.
- मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात थोडे बदामाचे तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल आणि कोरफड जेल मिसळून एकजीव करा.
- तयार झालेली क्रीम एका काचेच्या हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
कसा करावा वापर?
दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून क्रीम चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करत लावा. नियमित मसाजमुळे चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारते, सैल पडलेली त्वचा घट्ट होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या व काळे डाग नाहीसे होतात.
(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
Comments are closed.