Diwali 2026 – साडी, दुप्पट्यापासून बनवा आकर्षक तोरण

सण उत्सवात आपल्याकडे प्रवेशद्वाराला तोरण बांधले जाते. तोरण हे सुख समृध्दीचे आनंदाचे स्वागत करण्यासाठी बांधले जाते. यामुळे पूर्वी झेंडुची फुले आणि आंब्याच्या पानाचे आकर्षक तोरण दारोदारी बांधले जायचे. पण आता इलेक्ट्रीक तोरणासह, विणकाम, नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण बाजारात मिळतात. पण ही तोरण महाग असतात. त्यावर तुम्ही साड्यांच्या लेस किंवा आकर्षक दुप्पट्यांपासून घरच्या घरी सुंदर तोरण बनवू शकता.

ही तोरण धुऊन पुन्हा वापरता येतात. ही तोरण बनवण्यासाठी काय सामान लागते ते बघूया.

१ जुन्या साड्या किंवा दुप्प्च्यांच्या लेस काढा. जर लेस गोल्डन कलरची असेल तर उत्तमच.

२ साड्यांवर बऱ्याच वेळा कलर फुल पॅच डिझाईन असतात. तुम्ही ते पॅच सोनेरी लेसवर चिकटवून त्याचेही तोरण बनवू शकता.

३.एका तोरणासाठी साधारण १० ते १४ पॅच लागतात. कमी असतील तर तुम्ही मध्ये इतर डिझाईनचे पॅच मिक्स मॅच करून लावू शकता.

४. साडीची सुंदर बॉर्डर किंवा लेसला तुम्ही मोत्यांच्या लटकन चिकटवून त्याचेही तोरण बनवू शकता.

५ .कपड्यांचा गम मिळतो त्याचा वापर यात करावा.

कृती

सर्वात आधी तोरणासाठी लेस किंवा बॉर्डरवर अंतर ठेवून ग्लू लावा.

त्यानंतर त्यावर दुसऱ्या डिझाईनचा कपडा चिकटवा.

तोरणाच्या तिन्ही बाजू वेगळ्या चमकदार कपडा किंवा लेसने चिकटवा. त्यामुळे तोरण आकर्षक दिसेल.

नंतर अंतरावर ग्लूने पॅच चिकटवा.

त्यावर किंवा त्यासाली ठराविक अंतराने लटकन,मोत्याचे माळा,चिकटवा.

Comments are closed.