वनिता खरातने केलं 29 किलो वजन कमी, कसा होता तिचा डाएट?




वनिता खरात वजन कमी


महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिची वेटलॉस जर्नी. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने तिची वेट लॉस जर्नी सांगितली. तिने या काळात नेमकं काय काय केले, कोणता डाएट रूल फॉलो केला हे जाणून घेऊया.

वनिताने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखती दिली. यावेळी तिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. वनिता म्हणाली,” मी आतापर्यंत 29 किलो वजन कमी केले आहे, अजून मला 9 किलो वजन कमी करायचे आहे.”

पुढे डाएटबद्दल वनिता म्हणाली, ”माझं डॉक्टरांनी लिहून दिलेले डाएट असतं. ते 15-15 दिवसात बदलतात”.

काय खाणं सोडलं आहेस? यावर वनिता म्हणाली, “मला गोड आधीही आवडायचे नाही, पण मला डार्क चॉकलेट केक खूप आवडतो. पण, मी ते सोडलं आहे. मी भात खात नाही. मी संध्याकाळी शक्यतो खात नाही, जमलं तर सूप पिते. ज्वारीची भाकरी, चवळीची भाजी, मसूरची भाजी, लाल माठ अशा भाज्या खाते, फळं खाते.”

वनिताला वडापाव प्रचंड आवडतो. पण तिने तो गेले आठ महिने खाल्ला नाही. पण अजून 4 ते 5 किलो वजन कमी केल्यानंतर मी वडापाव खाईन असं तिने सांगितले आहे.

हेही वाचा – Mallika Sherawat Birthday: एअर होस्टेस ते अभिनेत्री; मल्लिका शेरावतविषयी खास गोष्टी



Comments are closed.