डॉक्टरांना मेडिकल हिस्ट्री सांगणे का गरजेचे ?

डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काहीही लपवू नये असे म्हटले जाते. कारण आजारांचे अनेक प्रकार आहेत. यामुळे डॉक्टरांकडे गेल्यावर सध्याच्या त्रासाबरोबरच आपल्याला पूर्वी झालेले आजार, सुरू असलेली औषधे, ॲलर्जी आणि कुटुंबातील आजारांची माहिती सांगणे अत्यंत महत्त्वाचे असते. यालाच मेडिकल हिस्ट्री (वैद्यकीय पूर्वइतिहास) असे म्हणतात. यातील काही आजारांचा थेट संबंध हा अनुवंशकतेशी असतो. त्यामुळे डॉक्टरांना तुमची फॅमिली मेडीकल हिस्ट्री म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या आजारांबद्दलची माहीती द्यावी. त्यात तुमच्या कुटुंबात आजी आजोबा , आई -वडील, भाऊ- बहीण, काका काकी,-मामा-मामी यातील कोणाला कॅन्सर, शुगर, यांसह हृदयाशी सबंधित आजार असेल तर त्याबदद्ल डॉक्टरांना सांगावे. कारण त्यामुळे डॉक्टरांना तुमच्यावर उपचार करणे सोपे होते.

याच मेडीकल हिस्ट्रीला मेडीकल फॅमिली असेही म्हणतात. कारण आपल्या त्वचेचा रंग, उंची, केस हे देखील अनुवंशिक गुणातून आपल्याला मिळतात. पण या व्यतिरिक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीत याप्रमाणे गुणसूत्रातून आपल्यात काही आजारांची लक्षणही येतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या आजार होण्याची शक्यता आहे हे तपासणे आणि त्यावर तात्काळ उपचार करणे डॉ्क्टरांना सोपे होते. त्यासाठी आपल्या कुटुंबात जर कोणाला वरील आजार असतील तर अशा कुटुंबातील व्यक्तींनी संभाव्य धोका ओळखून काळजी घ्यावी. त्यासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आजाराची माहीती ठेवावी. त्यात कुटुंबात आजाराने दगावलेल्या व्यक्तींची माहीती. कोणत्या वयात त्यांना आजाराची लक्षणे दिसू लागली. उपचार किती काळ सुरू होता. मृत्यूसमयी वय -कारण. समजा कुटुंबातील महीलेला गर्भावस्थेशी संबंधित व्याधी असतील तर त्याचाही रेकॉर्ड ठेवावा.

इतर कारणे

1. अचूक निदान

पूर्वी झालेले आजार आणि सध्याची लक्षणे यांची माहिती मिळाल्यामुळे डॉक्टरांना आजाराचे संभाव्य कारण समजण्यास मदत होते.

२. औषधांचे दुष्परिणाम

तुम्ही घेत असलेली औषधे, जीवनसत्त्वे, सप्लिमेंट्स आणि इतर उपचार यांची माहिती डॉक्टरांना दिल्याने औषधांमधील संभाव्य परस्परक्रिया टाळता येतात.

३. ॲलर्जीची माहिती देण्यासाठी

एखाद्या औषधाची, अन्नपदार्थाची किंवा इतर गोष्टींची ॲलर्जी असल्यास डॉक्टरांना आधीच सांगणे गरजेचे आहे.

४. आनुवंशिक आजारांचा धोका समजण्यासाठी

कुटुंबात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा काही प्रकारचे कर्करोग असल्यास डॉक्टरांना प्रतिबंधात्मक तपासण्यांचा सल्ला देता येतो.

५. योग्य उपचारपद्धती निवडण्यासाठी

पूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल होण्याचा इतिहास, जुन्या तपासण्यांचे अहवाल आणि दीर्घकालीन आजार यांनुसार उपचार ठरवता येतात.

Comments are closed.