पीरियड्सच्या काळात कपड्यांची निवड करताना या चुका टाळा

पीरियड्स सुरू झाले की पोटदुखी, कंबरदुखी, थकवा यांसोबतच कपड्यांमुळे होणारा त्रासही अनेक महिलांना जाणवतो. कधी घट्ट जीन्स घातल्यामुळे अस्वस्थ वाटतं, तर कधी हलक्या रंगाच्या कपड्यांमुळे डाग लागण्याची भीती सतावत राहते. अशा वेळी कपड्यांची निवड करताना फॅशनपेक्षा आराम आणि स्वच्छतेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण चुकीच्या कपड्यांमुळे घाम, ओलावा आणि घर्षणामुळे त्रास वाढू शकतो.

कपडे निवडताना टाळा या चुका

खूप घट्ट कपडे घालू नका: स्किन टाइट जीन्स किंवा घट्ट लेगिंग्समुळे पोटावर दाब आणि घर्षण जाणवू शकतं. त्यामुळे सैल आणि आरामदायी कपडे निवडा.

सिंथेटिक फॅब्रिक टाळा: नायलॉन किंवा पॉलिस्टरसारख्या कमी श्वास घेणाऱ्या कापडांमुळे घाम आणि ओलावा साचू शकतो. शक्यतो सुती कपड्यांना प्राधान्य द्या.

अस्वच्छ इनरवेअर वापरू नका: ओलसर किंवा न धुतलेली अंडरवेअर वापरणं टाळा. स्वच्छ, कोरडी आणि योग्य मापाची कॉटन अंडरवेअर वापरा.

फिकट रंगांचे कपडे: डा  गांची चिंता असल्यास गडद रंगांचे कपडे निवडा किंवा गरजेनुसार अतिरिक्त संरक्षण वापरा.

ओले कपडे टाळा: घाम किंवा रक्ताचे डाग लागलेले कपडे शक्य तितक्या लवकर बदला.

पीरियड्सच्या काळात सुंदर दिसण्यापेक्षा आरामदायी आणि स्वच्छ राहणं महत्त्वाचं आहे. योग्य कपडे, स्वच्छ इनरवेअर आणि वेळेवर सॅनिटरी पॅड बदलण्याची सवय यामुळे हा काळ अधिक आरामदायी होऊ शकतो. स्वतःच्या शरीराला काय सोयीचं वाटतं, यानुसार कपड्यांची निवड करा.

Comments are closed.