भारतातील टॉप 10 पैकी पाच कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांनी घटले!
टॉप 10 मध्ये टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचे मार्केट कॅप 34,263.28 कोटी रुपयांनी घसरून 8.53 लाख कोटी रुपये झाले आहे.
या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्येही घसरण झाली असून ती 31,869.13 कोटी रुपयांनी घटून 17.70 लाख कोटी रुपयांवर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे मार्केट कॅप या कालावधीत 25,891.88 कोटी रुपयांनी घटून 9.86 लाख कोटी रुपये झाले आहे.
HDFC बँकेचे मार्केट कॅप 7,165.37 कोटी रुपयांनी घसरून 11.21 लाख कोटी रुपयांवर आले. ICICI बँकेचे मूल्य 2,792.65 कोटी रुपयांनी कमी होऊन 10.18 लाख कोटी रुपये झाले आहे.
याशिवाय टॉप 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 55,149.45 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचे बाजारमूल्य २६,४३८.४९ कोटी रुपयांनी वाढून ५.२३ लाख कोटी झाले.
भारती एअरटेलनेही चांगली वाढ नोंदवली. त्याचे मूल्यांकन 20,592.13 कोटी रुपयांनी वाढले आणि ते 12.43 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 3,548.79 कोटी रुपयांनी वाढून 6.77 लाख कोटी रुपये झाले, तर लार्सन अँड टुब्रोचे मूल्यांकन 2,490.66 कोटी रुपयांनी वाढून 5.59 लाख कोटी रुपये झाले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 2,079.38 कोटी रुपयांनी वाढून 4.91 लाख कोटी रुपये झाले.
आठवड्याच्या शेवटी, रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी राहिली. त्यापाठोपाठ भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, टीसीएस, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, एलआयसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा क्रमांक लागतो.
Comments are closed.