Plane Crash – ऑस्ट्रेलियात लँडिंगदरम्यान विमान हँगरला धडकल्याने 2 ठार, 11 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड येथील पॅराफील्ड विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना घडली. छोटे प्रवासी विमान हँगरला धडकल्याने अपघातात दोन जण ठार झाले असून, अन्य 11 जण जखमी झाले आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास लँडिंगचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हँगरला धडकल्यानंतर विमानाला आग लागली. पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. अपघाताच्या वेळी विमानात किती प्रवासी होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.

Comments are closed.