IPL 2026 – सामना बघायला आला अन् रक्तबंबाळ झाला; पंजाब किंग्जच्या फलंदाजाने षटकार मारल्याने चाहता गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात एक धक्कादायक दुर्घटना घडली. पंजाबचा सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्य याने मारलेला एक षटकार थेट स्टँडमध्ये बसलेल्या एका वृद्ध चाहत्याच्या चेहऱ्यावर लागला. या आघातामुळे तो चाहता गंभीर जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मैदानावरील उपस्थित लोकांनी तातडीने त्या चाहत्याला मदत केली आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 4 बाद 222 धावांचा डोंगर उभा केला. पंजाबसाठी मार्कस स्टॉइनिसने 22 चेंडूत 62 धावांची वेगवान खेळी केली, तर प्रभसिमरन सिंगने 59 धावांचे योगदान दिले. प्रियांश आर्यने 11 चेंडूत 29 धावा केल्या.

IPL 2026: ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढली? रियान परागचा व्हिडीओ व्हायरल, अडचणीत वाढ

पंजाब किंग्जने दिलेल्या २२३ धावांच्या या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. यशस्वी जयसवाल आणि डेव्हन फरेरा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने 19.2 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 228 धावा करत विजय मिळवला. पंजाब किंग्जचा या हंगामातील हा पहिलाच पराभव आहे, तरीही ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहेत. मात्र, विजयापेक्षाही खेळाडूच्या शॉटमुळे चाहत्याला झालेली दुखापत हीच या सामन्यात चिंतेची बाब ठरली.

Comments are closed.