कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदरमध्ये पाणीबाणी; ७ व २१ मे रोजी पाणीपुरवठा बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अलनीनो आणि आयओडी वाढण्याचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याने पाऊस लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागासोबत २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवलीसह मीरा-भाईंदरमध्ये ७ व २१ मे रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

एमएमआरडीएच्या बारवी धरण जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदरला होणारा पाणीपुरवठा ७ मे दुपारी १२ ते ८ मे दुपारी १२ वाजेपर्यंत तसेच २१ मे दुपारी १२ ते २२ मे दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Comments are closed.