स्थायी समिती सदस्य पद द्यायला 25 लाख! नीलम गोऱ्हेंनंतर शिंदे गटाच्या पुणे शहराध्यक्षांचा गंभीर

पुणे: दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सर्वत्र दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिंदेसेना आक्रमक झाली आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातील अलका चौकात शिवसेना शिंदे गटाने खासदार संजय राऊतांविरोधात आंदोलन सुरू आहे. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंबद्दल जे वक्तव्य केलं, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील अलका चौकात हातात फलक घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यावेळी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. कार्यकर्त्याला स्थायी समिती सदस्य पद द्यायला 25 लाख रुपये मागितले, असल्याचं भानगिरे यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना नाना भानगिरे म्हणाले, बाळा कदम आणि त्यांचे काही चेले होते, त्यावेळेस त्यांनी 25 लाखाची मागणी केली होती. पाच लाख रुपयांची एंट्री त्या ठिकाणी झालेली, म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी, काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागत आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे परंतु जे काही बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी शिवसेना शिंदे व त्याच्या वतीने निषेध नोंदवात आहोत. पुढे भानगिरे म्हणाले, पक्षातील काही नेत्यांना द्यावं लागलं नसेल पण, बाकीच्यांना काय द्यावे लागले असेल ते त्यांना माहिती आहे. परंतु जे आमच्यासोबत घडलं आहे, ते आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. आमच्यासारख्यांना मागितलं जात होतं, तर मग उच्च पदासाठी तर नक्कीच मागितलेलं असेल, आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काहीतरी मागितला असेल, तर उच्च पदासाठी देखील काही द्यावे लागला असेल असं म्हणत नाना भानगिरे यांनी नीलम गोरे यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य विकृती – संजय राऊत

नीलम गोऱ्हेंचं हे वक्तव्य म्हणजे विकृती आहे. पक्षातून जाताना त्या घाण करून गेल्या. ती अतिशय विश्वासघातकी बाई आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर मराठी साहित्य महामंडळाने माफी मागायला हवी. नीलम गोऱ्हे यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना 50 लाख रुपये दिले गेले. याची कबुली गोऱ्हेंनी स्वतः दिली आहे. त्याचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.