मध्य प्रदेशात ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेशमध्ये सिंगरौली जिल्ह्यात शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अंदाजे 10 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपमापन केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे राज्यात कुठेही पडझड किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, दुपारच्या सुमारास जाणवलेल्या धक्क्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. भूकंपाच्या हादऱ्याने अनेक लोकांनी सुरक्षिततेसाठी मोकळ्या मैदानात धाव घेतली.

Comments are closed.