मणिपूरमध्ये ३ दहशतवाद्यांना अटक

► इंफाळ

मणिपूर पोलिसांनी खंडणीवसुलीप्रकरणी प्रतिबंधित संघटनेशी संबंधित 3 उग्रवाद्यांना अटक केली आहे. हे उग्रवादी स्थानिक लोक आणि व्यावसायिकांकडून पैसे उकळत होते असे पोलिसांनी सांगितले आहे. दोन उग्रवाद्यांना इंफाळ पूर्व जिल्ह्dयातून अटक करण्यात आली आहे. दोघेही प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीचे सदस्य होते. या उग्रवाद्यांची नावे मैबाम अरुण सिंह आणि थांगजाम सुरंकुमार सिंह अशी आहेत. तर इंफाळ पूर्व जिल्ह्यातून कांगलेई यावोल कन्ना लुप समुहाच्या एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. या उग्रवाद्याचे नाव ब्रमाचारियामयुम सना शर्मा उर्फ इबुंगो आहे.

Comments are closed.