T20 Mumbai 2026: अर्जुन तेंडुलकरने षटकार मारत संघाला मिळवून दिला विजय, श्रेयस अय्यरचा संघ पराभूत
आयपीएल २०२६ चा हंगाम अर्जुन तेंडुलकरसाठी म्हणावा तसा गेला नाही. तो या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा भाग राहिला, त्याला लीग टप्प्यात आपल्या संधीसाठी बराच काळ वाट पाहावी लागली. संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याला अंतिम सामन्यात संधी देण्यात आली. आयपीएलमध्ये तो राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसला. त्याला टी२० मुंबई लीगच्या अगदी पहिल्याच सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी मिळाली आणि त्याने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने अष्टपैलू कामगिरी केली.
या लीगमध्ये चौथा सामना Sobo मुंबई फाल्कन्स विरुद्ध ARCS अंधेरी असा खेळला गेला. अंधेरी शिवम दुबेच्या नेतृत्वाखाली खेळत असून फाल्कन्सचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होते. अंधेरीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण केले आणि श्रेयसच्या नेतृत्वाखालील फाल्कन्सला १८.२ षटकांत १२६ धावसंख्येवर रोखले. यावेळी डावखुरू वेगवान गोलंदाज अर्जुनने एक विकेटही घेतली. त्याने तीन षटकांत २१ धावा दिल्या.
गोलंदाजीनंतर अर्जुनने फलंदाजीतही कमाल केली. संघातील वरच्या फळीने चांगली सुरूवात करून दिली होती, मात्र १४ व्या षटकात ११९ धावसंख्येवर पाचवी विकेट पडली असता अर्जुन फलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि त्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत विराट कोहली स्टाईलने सामन्याचा शेवट केला. त्याने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना अंधेरीने ५ विकेट्सने जिंकला.
जेव्हा फाल्कन्स फलंदाजीला आले तेव्हा त्यांची सुरूवात चांगली झाली नाही. श्रेयस केवळ ५ धावा करत तंबूत परतला. त्याला दुबेने बाद केले. आदित्या तरेने ३९ चेंडूंत ५९ धावा केल्याने फाल्कन्सला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना अंधेरीसाठी सलामीवीर दिव्यांश सक्सेनाने ५० धावांची खेळी करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली.
Comments are closed.