आयसीसी क्रमवारीत 36 वर्षांचा दुष्काळ संपला! जसप्रीत बुमराहसोबत मॅट हेन्री कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या अपडेटनुसार, ओव्हलमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड रोमांचक कसोटी सामन्यामुळे दोन खेळाडू आयसीसी पुरुष क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचले आहेत. यामध्ये सामनाविजयी लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या मॅट हेन्रीने गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिला क्रमांक काबीज करत जसप्रीत बुमराहला एकप्रकारे टक्कर दिली आहे.

हेन्रीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ११ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर हा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आला आहे. कसोटीमध्ये पहिल्या क्रमांक गाठणारा तो न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून बुमराहचे एकट्याचेच पहिल्या क्रमांकावर वर्चस्व होते. तो नोव्हेंबर २०२४ मध्ये कागिसो रबाडाला मागे टाकल्यापासून त्या क्रमांकावर होता. आता इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आणणारा हेन्री त्याच्यासोबत अव्वल स्थानावर आला आहे. त्याच्याआधी जॅक कोवी (१९४७) आणि रिचर्ड हेडली (१९८४-१९९०) यांनी अव्वल स्थान पटकावण्याची कामगिरी केली होती. आता हेन्रीने हे स्थान मिळवत न्यूझीलंड ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडच्या जो रुटने ४६ आणि ७७ धावा केल्या होत्या. हा सामना यजमानांनी २५३ धावांनी गमावला होता, मात्र याचा परिणाम क्रमवारीवर दिसला. रुट फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आला आहे. त्याने आपला संघसहकारी हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड यांना मागे टाकत आपल्या शानदार कारकिर्दीत १२व्यांदा अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे.

तसेच भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिका संपल्यानंतर क्रमवारीमध्येही मोठा बदल झाला आहे.
भारताचा कर्णधार शुबमन गिलने अफगाणिस्तानविरुद्ध उत्तम कामगिरीच्या जोरावर तीन स्थांनांनी झेप घेत दुसरा क्रमांक गाठला. तो अव्वल क्रमांकावरील डॅरिल मिचेलपेक्षा केवळ २४ रेटिंग गुणांनी मागे आहे. त्याचा संघसहकारी इशान किशन तब्बल २१ स्थानांची झेप घेत संयुक्तपणे ४३ व्या स्थानावर पोहोचला आहे.

Comments are closed.