विलास घुले मृत्यूप्रकरणात धक्कादायक माहिती, पुरवणी जबाबात बजरंग सोनावणेंच्या मुलाचं नाव
बीड विलास घुले प्रकरण: केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले (Beed Vilas Ghule Case) या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. अशातच मंगळवारी विलास घुले यांचा मृतदेह नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विलास घुले हत्या प्रकरणात एकूण नऊ आरोपी आहेत. सर्व आरोपींना विविध ठिकाणाहून बीड पोलिसांच्या विशेष पथकांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तर आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
Beed Crime : पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचे नाव
दरम्यान, पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांचे पुत्र सौरव सोनवणे (Saurabh Sonawane) यांचे नाव घेतले असून याचाही तपास केला जाणार आहे. एकीकडे या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते. त्यानुसार आता पुरवणी जबाब नाव घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी दिलीय.
बीड विलास घुले प्रकरण: तपासाची चक्रे गतिमान करत प्रकरणातील सर्व अरोपींनाही अटक
केज तालुक्यात 20 जूनच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला. मात्र, सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळे-मुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी कालावधी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे. तर या हत्या प्रकरणी आज माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मृत विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून शिक्षा व्हावी, याबाबत लेखी स्वरूपात धनंजय मुंडे यांनी निवेदन दिले. तर आता पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत प्रकरणातील सर्व अरोपींनाही अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.