कट्टर विरोधक आमनेसामने, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात ठेवून काय म्हटलं? विधिमंडळ प
मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली असून, पहिल्या दोन दिवसांतच विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या काळात सभागृहात जितका संघर्ष पाहायला मिळतो, तितकीच राजकीय घडामोडी आणि टोलेबाजी विधिमंडळ परिसरातही रंगताना दिसते. अनेकदा राजकीय पटलावर एकमेकांचे विळा-भोपळ्याचे सख्य असणारे कट्टर विरोधकही विधिमंडळात एकत्र बोलताना, विनोद करताना आणि एकमेकांना टाळ्या देताना दिसतात. असाच एक कमालीचा राजकीय प्रसंग आज शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Nitesh Rane) आणि भाजपचे आक्रमक आमदार नितेश राणे (Aditya Thackeray Nitesh Rane) यांच्यात पाहायला मिळाला.(Aditya Thackeray Nitesh Rane)
विधानपरिषदेच्या कामकाजासाठी हे दोन्ही युवा नेते उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगाने माध्यमांचे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.(Aditya Thackeray Nitesh Rane)
Aditya Thackeray Nitesh Rane : “तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत!”
अधिवेशनामुळे नेहमीप्रमाणेच विधिमंडळ परिसरात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची आणि प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली होती. कॅमेरे आणि पत्रकारांची ही गर्दी पाहून आमदार आदित्य ठाकरे सभागृहाकडे जात असताना, तिथेच उभे असलेले नितेश राणे यांनी माध्यमांच्या गर्दीकडे पाहत राणे यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून हसत हसत म्हटले, “तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत!” इतकेच बोलून न थांबता नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर आपुलकीने हात लावला आणि दोन्ही नेते हसत हसत आपापल्या कामासाठी पुढे निघून गेले.
Aditya Thackeray Nitesh Rane : सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
चालू पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी यांच्यात वेगवेगळ्या विषयांवरून जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत. त्यातच नितेश राणे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन टोकं मानले जातात. जाहीर सभा आणि सोशल मीडियावरून एकमेकांवर अत्यंत बोचरी टीका करणाऱ्या या दोन प्रमुख युवा नेत्यांमध्ये विधिमंडळाच्या आवारात झालेली ही हलकी-फुलकी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही नेत्यांच्या या अनपेक्षित भेटीचे व्हिज्युअल्स आणि नितेश राणेंची ही टिप्पणी सध्या सोशल मीडियावरील राजकीय वर्तुळात तुफान व्हायरल होत आहे.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.