ओमराजेंच्या शिवसेनाप्रवेशावर कट्टर विरोधक राणाजगजीतसिंह पाटलांची रोखठोक प्रतिक्रिया; 2029 बाबतच
Omraje Nimbalkar Operation Tiger: खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या पक्षांतरानंतर आता ते महायुतीतील एका पक्षाचा भाग झाले आहेत. अशातच त्यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी आलेल्या सर्व खासदारांचं महायुतीत स्वागत केलं आहे, तर ओमराजेंबाबत (Omraje Nimbalkar) भाष्य देखील केलं आहे.
Ranajagjitsinha Patil on Omraje : डॉक्टर साहेबांवरती प्रचंड अन्याय झाला
माध्यमांशी बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, कालच मी या बाबतीमध्ये बोललो होतो की, जे सहा खासदार एनडीएमध्ये आलेले आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या सकट सर्व सहा खासदारांचं काल मी एनडीएमध्ये स्वागत केलं होतं, मी हेही म्हटलं होतं की, प्रतिस्पर्धी वगैरे आता विषय राहत नाही. कारण ओमराजेंनी स्वतःहून एनडीए मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यानंतर जे काही भाष्य झालं त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. योग्य वेळेस मला जेव्हा वाटेल तेव्हा मात्र नक्की बोलेल. त्याचबरोबरीने असंही आज कुणीतरी खोडसळपणे पसरवलं की, आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा काहीतरी नागरी सत्कार होणार आहे. ही बातमी अतिशय चुकीची आहे. आदरणीय डॉक्टर साहेब आता त्या परिस्थितीमध्ये नाहीयेत की ते उभं सुद्धा राहू शकतात. दुर्दैवाने हे सगळं जे घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि न्यायालयाच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्याबद्दल देखील मी अधिक आता काही बोलणार नाही. वास्तव एवढंच आहे की डॉक्टर साहेबांवरती प्रचंड अन्याय झाला. खूप गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या. त्यांचा कुठला काही सत्कार वगैरे असा काही नियोजित नाहीय, अशी माहिती देखील भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.
Ranajagjitsinha Patil on Omraje : एनडीए म्हणून प्रत्येकानी काही गोष्टी पाळणं हे देखील अपेक्षित
आता तुमचं राजकारण संपवणार वगैरे ओमराजे निंबळकर भूमिका मांडतात या सगळ्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार मांडणार आहात का? कारण की आता महायुतीमध्ये ओमराजे आलेले आहेत, त्यामुळे महायुती ही एकत्रित निवडणूक लढत असते त्यातच धाराशीमध्ये महायुती अस्तित्वात नाहीय का? यावरती आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, नाही मायबाप जनता जी आहे, ती ठरवत असते. कोणाला मतदान करायचं, त्यामुळे त्याविषयी काही जास्त बोलायची आवश्यकता मला वाटत नाही परंतु जे संबंधित वरिष्ठ आहेत, त्यांनी योग्य ते प्रबोधन करणं अपेक्षित आहे. एनडीए म्हणून प्रत्येकानी काही गोष्टी पाळणं हे देखील अपेक्षित आहे आणि अगदी गरज पडली तर मी बोलेन परंतु शक्यतो मला या विषयावरती आता काही भाष्य करायचं नाही, असंही ते पुढे म्हणालेत.
Ranajagjitsinha Patil on Omraje : शिंदे साहेबांना जर काही वाटत असेल, तर ते…
एकनाथ शिंदेनी आपली काल भूमिका मांडताना सांगितलं की, ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या संदर्भात अतिशय चुकीची गोष्ट घडली त्यांची हत्या झाली त्यामुळे आम्ही ओमराजेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका घेताना पाहायला मिळतात, म्हणजे त्यांचा थेट रोख तुमच्यावरतीच आहे की तुमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली याला अनुसरून त्यांनी सीबीआय चौकशीची देखील मागणी केली, नाही एक गोष्ट म्हणजे शिंदे साहेबांना जर काही वाटत असेल, तर ते नेते आहेत ते कधी माझ्याशी बोलू शकतात. स्पष्टपणे समोरासमोर त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. दुसरा विषय आहे, तो सीबीआयने हायकोर्टात जाण्याचा, ही साधारण प्रोसिजरल बाब आहे अशा खटल्यांमध्ये जेव्हा केव्हा निकाल होतो, ट्रायल कोर्टाचा, त्याच्यानंतर कुठलीतरी बाजू जी आहे ती, हायकोर्टामध्ये जातच असते. एक तर प्रोसक्यूशन जाते किंवा डिफेन्स जाते, हा विषय जो आहे तो अनुषंगिक विषय आहे, नॅचरल नॉर्मल विषय आहे, असंही ते म्हणालेत.
Ranajagjitsinha Patil on Omraje : मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली ती दोन महत्त्वाच्या
या सगळ्या वादानंतर किंवा ओव्हरऑल या घडामोडीनंतर आपण देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं कारण आहे?त्याचबरोबर जिल्ह्यात एक खासदार आहे, दोन वेगळ्या गटाचे आमदार आहेत आणि एकच फक्त म्हणजे एकमेव तुमचीच जागा आहे, तर संघर्ष जर कायम राहिला तर मतदार संघाला मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं? या प्रश्नावरती बोलताना भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली की दोन महत्त्वाच्या विकास कामांच्या बद्दल एक रिन्यूएबल फ्यूल म्हणजे नवकरणीय इंधन, अगदी शेतकऱ्यांचा जो काही शेतातला कचरा असतो, पीक आपण काढल्यानंतर नंतर जो कचरा
असतो, मग बग्यास असेल किंवा कांदा असेल, सडलेला कांदा असेल, या सर्व गोष्टींकडून त्याच्या माध्यमाती वरती प्रक्रिया करून क्रूड ऑईल बनवण्याची एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्या क्रूड ऑईल पासून डिझेल बनवलं जातं, जे ड्रॉपइन फ्यूल आहे म्हणजे आहे, त्या गाडीमध्ये मॉडिफिकेशन न करता हे डिझेल वापरलं जातं, गेले 15 दिवस माझ्या गाडीमध्ये मी हे नवकरणीय डिझेल वापरतोय, त्याबाबतीत आणि महाराष्ट्रातच ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे, व्यापक प्रमाणामध्ये ती महाराष्ट्रात वापरण्याच्या बाबतीत चर्चा झाली आणि उद्या आपल्या एसटी बसेसमध्ये जर हे नवकरणीय डिझेल वापरलं तर एमएसआरटीसी म्हणजे आपल्या महामंडळाचे साधारण साडेसातशे कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत. याबद्दलची पूर्ण माहिती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी दिली. त्याचबरोबरीने धाराशीवचा जो एअरपोर्ट आहे, त्या हवाई धाव पट्टीवरती आपण युएव्हीचं टेस्टिंग आणि आरएनडीच फॅसिलिटी करायचं
ठरवलंय, दीपक कपूर साहेब आपले जे नवीन एमएडीसीचे सीईओ आहेत, त्यांच्याकडे प्रस्ताव सोमवारीच दिलाय आणि देशातलं पहिलं युएव्हीचं टेस्टिंगच फॅसिलिटी आणि आरएनडी आणि इनोवेशनच हब अगदी इन्क्युबेशन हब, धाराशिवला करण्याच्या बाबतीतली चर्चा झाली असंही राणा पाटील यांनी सांगितलं आहे.
Ranajagjitsinha Patil on Omraje : एखादी व्यक्ती जेव्हा एनडीए मध्ये येते
तुमचा राजकीय विरोध कायम असणार आहे का? ओमराजे निंबाळकरांना ओमराजे निंबाळकर तर म्हणतात माझा राजकीय विरोधक तुम्ही आहात मग तुमचे तुम्ही त्याचे आहात का मग? त्यावरती राणा पाटील यांनी म्हटलं की, नाही. माझी मांडता माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की, एखादी व्यक्ती जेव्हा एनडीए मध्ये येते. तेव्हा ती एनडीए मधली असते यापेक्षा अधिक बोलण्यासारखं आहे असं मला नाही वाटत, 2029 ला जर ते उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा तुम्ही त्यांना मदत करणार का? या प्रश्नावर बोलताना राणा पाटील म्हणाले की, जो पक्ष ठरवेल, शेवटी भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे, पक्ष जो काही ठरवेल. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचं नेतृत्व जे म्हणेल ते बिलकुल मी करणार आहे, असंही ते म्हणालेत.
Ranajagjitsinha Patil on Omraje : मी स्वागतच केलं त्यांचं
तुमची राजकीय गोची झाली आहे का? मग या सगळ्या पक्षप्रवेशानंतर? यावर बोलताना राणा पाटील म्हणाले की, माझी राजकीय गोची व्हायचा प्रश्नच नाहीये. कारण या सर्वांचं आवर्जून आता मी स्वागतच केलं त्यांचं, योग्य वेळेस काही गोष्टी नक्की बोलेन मी आज नाही. ज्या काही घडामोडी घडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, निंबाळकर आलेले आहेत, एनडी त्या संदर्भात चर्चा झाली, नवीन काहीच नाहीये म्हणजे आता तुम्हाला जे समजायचं ते समजून घ्या हा विषय काही नवीन नाहीये, असंही ते पुढे म्हणालेत.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.