मणिपूरमध्ये ५.२ रिश्टर स्केलचा भूकंप

इंफाळ :

मणिपूरमध्ये सकाळी 5.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. या भूकंपाचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते. तर याचे धक्के शेजारील जिल्हा उखरुल आणि इंफाळ तसेच मेघालयातही जाणवले आहेत. भूकंपाच्या या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. परंतु भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments are closed.