गुजरातमध्ये फार्मास्युटिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू

दुर्घटनेनंतर विषारी वायू गळतीमुळे घबराट

भरुच: गुजरातच्याभरूच येथील सिंजिल फार्माकेम नावाच्या औषध कारखान्यात रिअॅक्टरच्या स्फोटात पाच कामगार ठार झाले. तसेच इतर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, कारखान्यातून मिथाइल डायक्लोराइड नावाच्या विषारी वायूची गळती झाल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. स्फोटाचे कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. 15,000 लिटर क्षमतेचा रिअॅक्टरचा स्फोट झाल्यामुळे हा अपघात घडला. स्फोटाचा आवाज 15 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. स्फोटानंतर लगेचच कारखान्यातून एमडीसी वायूची गळती सुरू झाल्यामुळे आत आणि बाहेर दाट धूर पसरला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांना आणि कामगारांना डोळ्यांचा तीव्र दाह जाणवल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.