एमपीएससी अध्यक्षांना हटविण्यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यात यावी, आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून हटविण्यात यावे. त्यांना पदावरून काढून टाकण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात यावी, अशी विनंती शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील गैरकारभाराबाबत राज्यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून हटविण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष यांच्यासह माजी अध्यक्ष आणि सदस्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी याचा संदर्भ देत एमपीएससीच्या विद्यमान अध्यक्षांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

 एमपीएससी अध्यक्षांची चौकशी होत असताना संबंधितांनी आपल्या पदावर राहणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सदर चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी विद्यमान अध्यक्षांना काढून टाकण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात यावी, अशी मागणी एका पत्राद्वारे महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.

Comments are closed.