Summer Drinks : उन्हाचा कहर वाढतोय.. शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी अवश्य प्या ही पेये

मागील काही दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली असून विशेषतः दुपारच्या वेळी तीव्र उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्यातील आलेल्या उष्णतेच्या लाटांनी लोक आधीच हैराण झाले असताना एप्रिलमध्येही प्रचंड तापमान आहे. त्यात आता येत्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढणार असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे घाम येतो. घामाद्वारे जरी शरीरारातील विषारी द्रव बाहेर पडत असली तरी त्याबरोबरच पाण्याचा अंशही कमी होतो. म्हणून, या दिवसात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या पेयाद्वारे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढू शकता. आज आपण पाण्याव्यतिरिक्त शरीर डिहायड्रेट न होण्यासाठी या दिवसात कोणती पेये प्यायला हवीत हे जाणून घेऊयात.

नारळ पाणी

नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन दिवसातून एकदा तरी नारळ पाणी प्यायला हवे. नारळपाणी मतखड्यावरही प्रभावी आहे. ज्या व्यक्ती मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी तर नारळ पाणी प्यायलाच हवे.

कोकम सरबत

कोकम सरबत आरोग्यवर्धक असून प्रकृतीने थंड आहे. शरीरातील पित्त, उष्णता यापासून दिलासा मिळण्यासाठी तज्ज्ञ कोकम सरबत या दिवसात पिण्याचा सल्ला देतात. तसेच कोकममध्ये हायड्रॉक्सिसिट्रिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते.

टक लावून पाहणे

ताक हे थंड असल्याने शरीराचे तापमान समप्रमाणात राखण्याचे काम  करते.  ताकात हिंग, कोथिंबीर, पुदिना आणि धने जिरेपूड टाकल्यास अधिक चवीष्ट लागते. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी ताकाचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करायला हवा.

जलजिरा

उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी जलजिरा हे उपयुक्त पेय आहे. विशेष म्हणजे जलजिरा आपण घरीही बनवू शकतो. जिऱ्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच चयपचयाच्या तक्रारीही दूर होतात.

बेलाचा रस

उन्हाळ्यात बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर असते. हे रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळेरोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच कोलेस्टेरॉलचा धोकाही कमी होतो.

हेही वाचा – Plastic Straw : स्ट्रॉ ने ज्यूस पिता? ही सवय शरीरासाठी ठरू शकते हानिकारक

Comments are closed.