Mumbai Local : आली रे आली! कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली पहिली स्वयंचलित दरवाजांची Non AC लोकल
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलकडे (Mumbai Local) पाहिले जाते. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांना एकत्र जोडण्याचे काम हे लोकल ट्रेन करते. दररोज लाखो प्रवासी या सेवेचा उपभोग घेतात. तसेच, दिवसाला हजारो लोकल फेऱ्या चालवल्या जातात. पण, याच लोकलचे जसे फायदे आहेत, तसेच नुकसानदेखील आहे. मुंबईत नोकरीसाठी येणारे लोंढे आणि वाढती लोकसंख्या यामुळे मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा नेहमी अधोरेखित केला जातो. समोर आलेल्या एका अहवालानुसार, गेल्या 20 वर्षांत म्हणजेच 2005 ते 2024 मध्ये अंदाजे 51 हजारहून अधिक लोकांचे मृत्यू हा रेल्वे रुळांवर झाला आहे. यापैकी मृतांची मोठी संख्या ही गर्दीने भरलेल्या गाड्यांतून खाली पडल्यामुळे झाल्याचे समोर आले.
Comments are closed.