उष्माघाताची लक्षणे आणि घरगुती उपचार

देशभरात उन्हाचा कडाका वाढला असून महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे पुढील काही दिवस सगळ्यांनीच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असते अशा व्यक्तींना या वाढलेल्या उष्म्याचा म्हणजेच हिट स्ट्रोकचा फार त्रास होत नाही. मात्र ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते अशा व्यक्तींना उष्माघाताचा त्रास अधिक होतो. यामुळे उष्माघात आणि त्याची लक्षणे आणि त्यावरील घरगुती प्राथमिक उपचारांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

उष्माघात
उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोक ज्याला सामान्य भाषेत ऊन लागणे असे म्हणतात. उन्हाळ्यात ऊन लागणे हे सामान्य जरी असले तरी काहींसाठी ते जीवघेणे ठरू शकते. कारण तीव्र उन्हाच्या संपर्कात आल्याने व्यक्तीच्या शरीराचे तापमानही वाढते पण घाम येत नाही. त्यामुळे शरीरात पाणी व मीठाची कमतरता निर्माण होते. परिणामी शरीर डिहायड्रेट होते. याअवस्थेत संबंधित व्यक्तीच्या शरीराचे तापमान १०५ अंशपर्यंत पोहचते. त्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. यामुळे यादिवसात उन्हात फिरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

लक्षणे
तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणें
उलटी, तीव्र अंगदुखी
त्वचा कोरडी पडणे, तापणे ,लाल चट्टे पडणे.
मळमळ, ताप
जुलाब
गोंधळून जाणे
स्नायू कडक होणे

वरील लक्षणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे असून त्यांची तीव्रता वेळेनुसार वाढत जाते. यामुळे जर रुग्णाला वेळीच उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाच्या मेंदू, हृदय, किडनीसह स्नायूंवर त्यांचे गंभीर परिणाम होतात. यामुळे वरील लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.

उपचार
उष्माघाताचा त्रास होत असल्यास सावली असेल त्या ठिकाणी तातडीने जावे.
तात्काळ डॉक्टरांकडे जावे.
सैल कपडे घालावे.
थंड पाण्याने शरीर पुसून काढावे किंवा अंगावर थंड पाणी ओतावे.
लिंबू-पाणी प्यावे.

जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाही उष्माघाताचा त्रास झाल्यास आहारात थंड द्रव्य पदार्थांचे सेवन करावे. जसे की अॅपल सायडर व्हिनेगर, (सफरचंदाचे व्हिनेगर). उन्हाळ्यात हे द्रव्य मिनरल आणि इलेकट्रोलाईटची कमतरता पूर्ण करते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या शरीराला आवश्यक असलेल्या मिनरल अॅपल सायडर व्हिनेगरमधून मिळतात. त्यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर टाकून पिल्यास आराम मिळतो.

चंदनासव
ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. जी तिच्या थंड प्रकृतीसाठी ओळखली जाते. याचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होते.

वेलीचा रस
बेलाचा रस हा उन्हाळ्यात वरदानाचे काम करतो. यात व्हिटामीन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दिवसातून दोन ते तीनवेळा बेलाचा रस आवर्जून प्यावा.

गिलोय
गिलोयचा रसही रोगप्रतिकारकशक्ती वाढवतो त्यामुळे तापात गिलोय रस नक्की प्यावा.

हलका आहार
उन्हाळ्यात नेहमीचा आहार टाळावा. त्याजागी हलका व साधा कमी तेलतिखट वापरलेला आहार घ्यावा.

सैल पण अंगभर कपडे वापरावे.

डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधूनच घराबाहेर पडावे.

रिकाम्या पोटी कधीही घराबाहेर पडू नये.

उन्हात फिरणे टाळावे.

पाणी भरपूर प्यावे.

लिंबू पाणी प्यावे.

पण तीव्र उष्माघाताची लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जावे.

Comments are closed.