Beauty Tips : लिपस्टिकवरील नंबरचा नेमका अर्थ काय?




लिपस्टिकवरील नंबरचा नेमका अर्थ काय?


मेकअपमध्ये लिपस्टिक हा असा एक घटक आहे, जो पूर्ण लूक बदलण्याची ताकद ठेवतो. साधा मेकअप असो किंवा एखादा खास प्रसंग योग्य शेडची लिपस्टिक लावली की चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. त्यामुळे अनेक मुलींच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या लिपस्टिक असतात. पण लिपस्टिक घेताना किंवा वापरताना आपण एक गोष्ट नेहमी पाहतो ती म्हणजे त्यावर लिहिलेले काही नंबर. ‘115’, ‘07’, ‘M12’ असे कोड्स नेमके काय दर्शवतात, याचा कधी विचार केला आहे का? (lipstick shade number meaning)

लिपस्टिकवरील नंबरचा नेमका अर्थ काय?
लिपस्टिकवर लिहिलेले हे नंबर म्हणजे त्या विशिष्ट शेडचा कोड असतो. प्रत्येक ब्रँड त्यांच्या प्रॉडक्ट्सना वेगळं ओळख देण्यासाठी हे कोड वापरतो.हा नंबर फक्त रंगच नाही, तर कधी कधी त्याचा टेक्श्चर, फिनिश किंवा कलेक्शनही दर्शवतो. म्हणजेच तो एक प्रकारचा “ओळख क्रमांक” असतो, ज्यामुळे ती लिपस्टिक इतरांपेक्षा वेगळी ओळखली जाते.

हे नंबर इतके महत्त्वाचे का असतात?
समजा तुम्ही एखादी लिपस्टिक वापरली आणि तिचा रंग तुम्हाला खूप आवडला. पण काही दिवसांनी तुम्हाला त्या लिपस्टिकचं नाव आठवलं नाही, तर? अशा वेळी तो छोटासा नंबर खूप उपयोगी ठरतो. कारण तोच त्या शेडचा खास कोड असतो. तुम्ही दुकानात किंवा ऑनलाइन तो नंबर सांगितला, की तुम्हाला अगदी तोच रंग पुन्हा सहज मिळू शकतो.

नाव आणि नंबर दोन्ही का असतात?
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, लिपस्टिकवर नंबरसोबत एखादं नावही दिलेलं असतं. याचं कारण म्हणजे एकाच नावाचे शेड्स वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये असू शकतात. म्हणूनच ब्रँड्स नंबर आणि नाव दोन्ही देतात, जेणेकरून त्यांच्या प्रॉडक्टची वेगळी ओळख तयार होईल आणि ग्राहकांना योग्य प्रॉडक्ट शोधणं सोपं जाईल.

म्हणूनच, पुढच्या वेळी लिपस्टिक घेताना फक्त रंगाकडे नाही, तर त्या छोट्या नंबरकडेही नक्की लक्ष द्या कारण तोच तुमच्या परफेक्ट लूकचा खरा साथीदार ठरू शकतो.



Comments are closed.