Kids Traditional Outfit : बच्चेकंपनीसाठी हे आहेत परफेक्ट ट्रे़डिशनल आऊटफिट
सण म्हटलं की पारंपरिक कपडे आलेच. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण 19 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने तुम्ही घरातील बच्चे कंपनीचा ट्रेडिशनल लूक करू शकता.त्यातच अक्षय्य तृतीयाचा दिवस म्हणजे मुहूर्तांचा. मग यादिवशी मोठ्यांप्रमाणेच बच्चेकंपनीचाही तुम्ही ट्रेडिशनल लूक करू शकता. त्यासाठी कोणते कोणते ऑपश्न आहेत ते बघूया.आज आपण अशा काही स्मार्ट ट्रिक्स जाणून घेऊयात ज्या फॉलो केल्यास तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा अक्षय्य तृतीयेचा पारंपरिक लूक तयार होऊ शकतो.
लहान मुलांसाठी पर्याय
अक्षय्य तृतीयेला पारंपरिक कपड्यांमध्ये कुर्ता-पायजमा किंवा धोती हे कॉम्बिनेशन मुलावर ट्राय करता येईल. यात सिल्क किंवा कॉटनचा कुर्ता धोती किंवा पेन्सिल पँटसोबत मुलाला घालू शकता.
लहान मुलांसाठी नेहरू जॅकेट सेट हा सणवारासाठी उत्तम पर्याय आहे. हलक्या रंगाच्या कुर्त्यावर वर्क केलेले जॅकेट छान दिसते.
लग्नसमारंभ किंवा मोठ्या सणांसाठी इंडो-वेस्टर्न शेरवानी हा उत्तम पर्याय आहे. परंतू तुम्ही अक्षय्य तृतीयेला सुद्धा हे कपडे मुलांना घालू शकता.
मुलाचे वय 0 ते 3 वर्ष असेल तर कॉटन जॅकेट वर कॉटनची धोती मुलांना घालता येईल.
मुलगा 8 ते 10 वर्षाचा असेल तर मराठमोळा लूक त्याचा करता येईल. यासाठी कुर्ता-धोतीसोबत फेटा बांधता येईल.
लहान मुलींसाठी पर्याय
सध्या बाजारात मुलींसाठी विविध प्रकारचे कपडे मिळतात. तुम्ही साडीपासून शिवलेले ड्रेस, फ्रॉक त्यांना घालू शकता. यात अनारकली गाऊन आरामदायी असतात.
मुलीचा हेवी लूक करायचा असल्यास सध्या ट्रेंडमध्ये असलेला घरारा सेट घालू शकता.
अक्षय्य तृतीयेला पारंपरिक लूकमध्ये परकर पोलका त्यावर गजरा, गळ्यात मोत्याची माळ, हातात मोत्याच्या बांगड्या असा लूक करू शकता.
हे महत्त्वाचे –
सध्या उन्हाळा असल्याने कॉटनचे कपडे मुलांसाठी निवडणे उत्तम असेल. कॉटन व्यतिरिक्त सिल्क किंवा मऊ मलमलचे कापड निवडा जेणेकरून त्वचेला त्रास होणार नाही आणि लहान मुलांची चिडचिड होणार नाही.
वर्क असलेले कपड्यांच्या आत मऊ अस्तर असल्याची खात्री करा, जेणेकरून कपडे टोचणार नाहीत.
सणासुदीला लाल, पिवळा, केशरी, जांभळा यांसारखे गडद रंग छान दिसतात, पण सध्या ट्रेंडमध्ये असलेले पेस्टस शेड्सही उत्तम लूक देतात.
मुलांचे वय 0 ते 5 च्या दरम्यान असेल तर कपड्यांवर खूप जास्त भरतकाम किंवा जड वर्क नसलेले कपडे मुलांना घाला, जेणेकरून त्यांना गरम होणार नाही.
हेही वाचा – Saree Styling Tips : या ट्रिक्सने साध्या साडीतही दिसाल स्टायलिश
Comments are closed.