गरुड पुराणानुसार ‘या’ व्यक्तींपासून राहावे लांब





हिंदू धर्मात गरुड पुराणाला विशेष महत्व आहे. कारण यात जन्म मृत्यूच्या रहस्यांसह आयुष्य जगताना कोणते नियम पाळावेत याबद्दलही सांगितले आहे. गरुड पुराणात अशाही काही मानवी गुणदोषांचा उल्लेख आहे ज्यामुळे त्या व्यक्तीच्या संगतीत असलेल्या इतरांचेही आयुष्य़ही उध्वस्त होऊ शकते. कोणते आहेत हे गुण ते समजून घेऊया.

देखावा करणे
गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीला देखावा करण्याची सवय असते अशा व्यक्तींपासून नेहमी लांब राहावे. कारण या व्यक्तींमध्ये आपल्या श्रीमंतीचा, बु्ध्दीवान असल्याचा अहंकार असतो. त्यामुळे सतत समोरच्याला कमीपणा वाटावा अशा दिमाखात त्या वावरत असतात. आपल्या बुद्धीचा , श्रीमंतीचा देखावा करत असतात. अशा व्यक्तींना त्यांच्यापुढे कोणी गेलेले सहन होत नाही. त्यामुळे या व्यक्ती कोणाला पुढेही जाऊ देत नाहीत. अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा सल्ला गरुड पुराणात देण्यात आलेला आहे.

नशीबावर विसंबून असलेल्या
ज्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांसाठी सतत नशिबाला दोष देते त्यापासून आपण लांब राहावे. असे गरुड पुराणात सांगण्यात आलेले आहे. ज्या व्यक्ती नशीबावर आपले कर्म ठरवत असतात त्या आळशी असतात. अशा व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही आलात तर तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाण्याचीच शक्यता अधिक असते. अशा व्यक्ती तुम्हाला प्रयत्न करण्यापेक्षा नशिबाच्या गोष्टी सांगून निराश करू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहावे.

वेळ वाया घालवणे
ज्या व्यक्तींना वेळेचे महत्व नसते त्यांच्यासंगतीत न राहीलेले उत्तम. अशा व्यक्ती कामापेक्षा वायफळ चर्चा, आणि दुसऱ्यांच्या चुका काढण्यात वेळ घालवतात. त्यामुळे तुमचाही वेळ वाया जातो.

नकारात्मक विचार

ज्या व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असतात अशांपासून लगेच दूर व्हावे. कारण या व्यक्ती तुमच्या प्रगतीत अडथळा बनू शकतात.तुम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा तुम्हाला निराश करण्यात त्यांना आनंद मिळतो. अशांपासून लांब राहण्याचा सल्ला गरुड पुराणात देण्यात आला आहे.



Comments are closed.