Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवाने असा साजरा केला 53 वा वाढदिवस
मुंबई : भारतीय क्रिकेटचा देव म्हंटले की, चेहरा समोर येतो तो सचिन तेंडूलकरचा. फक्त भारतच नव्हे तर जगभरात क्रिकेटमध्ये येणारे अनेक तरुण हे सचिन तेंडूलकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतात. त्याचा कीर्तिमान हा देशातच नव्हे तर सातासमुद्रापारही तेवढाच आहे. भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम करणाऱ्या सचिन तेंडूलकरने आज (24 एप्रिल) आपला वाढदिवस हा चाहत्यांसोबत साजरा केला. त्याने पत्नी अंजलीसोबत केक कापत दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.
Comments are closed.