मुलांना कोणत्या गोष्टी सांगाव्यात ?

लहान मुलांच विश्वच न्यार . त्यात गोष्टींची भर पडली तर बच्चेकंपनीच्या ज्ञानातही भर पडते आणि मनोरंजनातही. कारण पालकांनी सांगितलेल्या गोष्टींचा मुलांच्या विचारांवर, वागणुकीवर आणि भावनिक विकासावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे गोष्टी निवडताना त्या योग्य, सकारात्मक आणि शिकवण देणाऱ्या असणे खूप महत्त्वाचे आहे. मुलं याच गोष्टी ऐकूण घडत असतात. गोष्टीतील सगळीच पात्र, घटना त्यांना खरीखुरी वाटतात. त्यातील चांगल्या पात्राची ती नक्कलही करतात त्यांना आदर्शही मानतात. यामुळे मुलांना गोष्टी सांगताना त्या नैतिक मूल्य शिकवणाऱय्ा सांगाव्यात. पूर्वी मुलांना पंचतंत्राच्या गोष्टी सांगितल्या जात कारण पंचतंत्रातील गोष्टी या विष्णुशर्मा यांनी रचलेल्या प्राचीन नीतिशास्त्राचा एक भाग आहेत. त्या प्राणी-पक्ष्यांच्या कथेमधून मुलांना मूल्यशिक्षण, शहाणपण आणि व्यवहारज्ञान शिकवतात. यात प्रामुख्याने मैत्री, बुद्धिमत्ता, सावधगिरी आणि मैत्री या विषयांवरील गोष्टी असल्याने त्यामागे अर्थ दडलेला आहे. यामुळे मुलांना कोणत्या प्रकारच्या गोष्टी सांगाव्यात ते समजून घ्यावे.

नैतिक मूल्य शिकवणाऱ्या गोष्टी

प्रामाणिकपणा, मैत्री, मदत करण्याची वृत्ती, संयम यांसारखी मूल्ये शिकवणाऱ्या गोष्टी मुलांना योग्य दिशा देतात.

प्रेरणादायी गोष्टी

मेहनत, चिकाटी आणि धैर्य यावर आधारित कथा मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवतात.

कल्पनाशक्ती वाढवणाऱ्या गोष्टी

परीकथा, प्राणी-कथा किंवा जादुई गोष्टी मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवतात.

सकारात्मक शेवट असलेल्या गोष्टी

गोष्टीचा शेवट आनंददायी असेल तर मुलांमध्ये आशावाद निर्माण होतो.

वास्तवाशी जोडलेल्या गोष्टी
दैनंदिन जीवनातील अनुभवांवर आधारित कथा मुलांना योग्य वर्तन शिकवतात.

गोष्टींचा मुलांवर होणारा परिणाम

विचारसरणी विकसित होते

गोष्टींमुळे मुलं चांगलं-वाईट यातील फरक समजू लागतात.

भाषा आणि संवाद कौशल्य वाढते

नवीन शब्द, वाक्यरचना आणि अभिव्यक्ती शिकायला मदत होते.

भावनिक विकास होतो

सहानुभूती, प्रेम, आणि इतरांच्या भावना समजण्याची क्षमता वाढते.

सर्जनशीलता वाढते

कल्पनाशक्तीला चालना मिळते.

आत्मविश्वास वाढतो

प्रेरणादायी पात्रांमुळे मुलं स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात.

पालकांनी मुलांना सांगणाऱ्या गोष्टी केवळ मनोरंजनासाठी नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक, मूल्याधारित आणि वयोगटानुसार योग्य गोष्टी निवडणे आवश्यक आहे.

Comments are closed.